पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

म्हणजे लग्नाचा नरिस अवशेष मानण्यांत येतो. परस्परनिरीक्षणाला अनु-- चित प्राधान्य प्राप्त झालें आहे. परंतु परस्परनिरीक्षण विधत वधूवर विवाहाची पहिली पायरीहि चढत नाहींत. म्हणून कन्यादानापासूनच ज्यांना सुरवात करावयाची असेल त्यांनीं “ तुभ्यं विप्र मया दत्ता पुत्र- पौत्रप्रवर्धिनी " हे शब्द उच्चारतांच लग्न लागलें म्हणून समजावें व त्या वेळेसच मंगलवाद्यांच्या घोषांत सुमुहूर्तावर वधूवरांनीं एकमेकांच्या गळ्यांत पुष्पहार - लग्नाच्या विड्या — घालाव्या व नंतर पानसुपारी वाटण्यांत यावी. कन्यादानानंतर विवाहहोमाला वधूपित्याची गरज नसते तेव्हां तो आगतांचा सत्कार करण्यास मोकळाहि होतो.
 कन्यादान आणि विवाहहोम त्ह्यांत मोठा भेद आहे. कन्यादान हें वधूच्या पित्याचें कर्म असतें. ह्या पुण्याचा धनी तो. पण कोणी आपली कन्या दुसऱ्याला दिली म्हणजे तेवढ्यावरून ती त्याची भार्या कशी होणार ? भार्यात्वाचा संस्कार तिच्यावर झालाच पाहिजे. कन्यालाभावांचून भार्या- त्वसिद्धि नाहीं. पण कन्यादान होऊन एकदां कन्या प्राप्त झाली म्हणजे तिच्या ठिकाणीं भार्यात्व सिद्ध करणें हैं एकट्या वराचें काम आहे. कन्या- दान करून विवाहहोम केला नाहीं तर तसेंच कन्यादानाशिवाय नुसतां विवाहहोम केला तर तें कायदेशीर लग्न होणार नाहीं. कन्याविष- यक दानप्रतिग्रहार्ने विवाहाची पूर्तता होणार नाहीं. 'प्रतिगृहीतायामस्यां वध्वां भार्यात्वसिद्धये गृह्याग्निसिद्धये च विवाहहोमं करिष्ये' हा संकल्प फार महत्त्वाचा आहे. एकादी स्त्री कायदेशीर रीतीनें आपल्या ताब्यांत आली म्हणजे ती आपली भार्या झाली असें होत नाहीं. तात्पर्य कन्या- वरण, कन्यादान आणि भार्याकरण अशा ह्या विवाहांतील तीन पायऱ्या आहेत. कन्यावरण मुलाचा बाप करितो. कन्यादान मुलीचा बाप करतो व भार्याकरण स्वतः नवरा करतो.
साचा:Rule3em

१६