पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विवाहपद्धतिः - संस्कार की सोहळा.

वधूच्या पित्याकडून होत असलेला क्षम्यच गणला पाहिजे. पण ज्यांना विवेकपूर्व कर्म करण्याची इच्छा असेल त्यांनी तरी नवीन पायंडा पाडावा. म्हणजे मुलाच्या बापानें हुंडा घेऊं नये व मुलीच्या बापाने आपल्या ऐप- तीप्रमाणें सालंकृत कन्यादान करावें. ह्यांत धर्माची हानि न होतां वर- पित्याचा स्वार्थहिं बुडत नाहीं. पण तनुविक्रय करणाऱ्या वेश्यांना भाड्यानें जागा देणाऱ्या घरवाल्यांची चतुराई व दक्षता दाखवणाऱ्या वरपित्यांना ह्या धर्मांच्या सात्विक गोष्टी सांगून कोणता फायदा होणार ? तान्प्रति नैष यत्नः.
 कन्यादानानंतर कन्या भार्यापदारूढ होण्याकरितां विवाहहोम विहित आहे. शिवाय अनि सिद्ध करणें हें गृहस्थाश्रम्याचे आद्य कर्तव्यहि आहे. विवाहहोमांत पाणिग्रहण आणि सप्तपदी हे दोन विधि फार महत्वाचे आहेत. “गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं" असे म्हणून वर वधूचें पाणि- ग्रहण करतो. सप्तपदीपर्यंत तर विवाहग्रंथि अभेद्य होतच नाहीं. सप्तपदी- नंतर वधूचें जन्मांतर पूर्ण झालें असें शास्त्र आहे. “ स्वगोत्राद् भ्रश्यते नारी विवाहात् सप्तमे पदे " अशी यमस्मृति आहे. आपल्याबरोवर सात पावलें चालणारा आपला मित्र होतो ही कल्पना फार प्राचीन आहे. अथर्ववेदांत वरुण आणि अथर्वन् ह्यांच्या संभाषणांत मी तुझा सप्तपदसखा आहे असें एकानें दुसऱ्याला म्हटलें आहे. " देहि नु मे यन्मे अदत्तो असि युज्यो मे सप्तपदः सखासि । ” अर्थः-मला दिलें नाहींसें तें दे. सात पावलें बरोबर चालल्यामुळें तूं माझा योग्य मिल झाला आहेस. " ददामि तत् यत् ते अदत्तो अस्मि युज्यस्ते सप्तपदः सखास्मि अर्थः-मी न दिलेलें तुला देतों. मी तुझा योग्य असा सात पावले चाल- लेले सखा आहे. (५-११ - ९ - १० ). ह्याप्रमाणे सप्तपदीनंतर विवाह- ग्रंथि कायमची बांधली जाते. करतां कन्यादानापासून सप्तपदीपर्यंत सर्व विधि लक्ष्यपूर्वक व श्रद्धायुक्त अंतःकरणाने करण्यांत यावेत. सध्या हे कृत्य

१५