पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

तर वाग्निश्चयविधि केला नाहीं तरी कोणताहि प्रत्यवाय नाहीं. ह्या विधी- मध्यें वेदमंत्र म्हणावयाचे नसतात ह्यामुळे तो कृताकृत आहे असेंच सिद्ध होतें. घटकेनें पुढें प्रत्यक्ष विवाहच होणार तर मग वाग्निश्चय विधिपूर्वक करण्यांत स्वारस्य तें काय ? परिशिष्टांत हा विधि सांगितला असल्यामुळेंहि त्याचें गौणत्व अनुमित होते.
 वाग्दानाला फांटा दिला म्हणजे कन्यादान आणि विवाहहोम ह्या दोन गोष्टी राहतात. कन्यादान झालें तरी भार्यात्व प्राप्त होण्याला सप्तपद्यंत विवाह होण्याची आवश्यकता असते. तेव्हां कन्यादान आणि विवाहहोम म्हणजेच लग्न होय. हीं यथासांग, अवधानपूर्वक आणि सुमुहूर्तावर कर- ण्याची दक्षता घ्यावी. परस्परनिरीक्षण ह्यालाच सध्यां आपण लग्न म्हणून समजतों. त्यामुळे वधूवरांनीं परस्परांच्या गळ्यांत माळ घातली म्हणजे कार्यसिद्धि झाली, गंगेत घोडे न्हाले, असें वाटून पुढच्या मुख्य गोष्टीकडे साहजिक दुर्लक्ष केलें जातें हें प्रयोगकारांचें “परस्परनिरीक्षण” सूत्रग्रथित नाहीं. मोठेसें अन्वर्थकहि नाहीं. व त्यांतच लग्नाचें सर्व सार आहे अशी भ्रामक समजूत दृढ होऊन बसल्यामुळे हा विधि अजिबात गाळून टाकावा हेंच युक्त होय. सूत्रकारांनी सांगितल्याप्रमाणें “ अलंकृत्य कन्यामुदकपूर्वां दद्यात् " असें म्हणून एकदम कन्यादानालाच आरंभ करावा. ब्राह्मविवाहानें आपलीं लग्ने होतात. ह्या विवाहाचें वैशिष्टय म्हणजे अलंकारयुक्त कन्येचें उदकपूर्व दान करणे. “ अद्भिरेव द्विजाग्रयाणां कन्यादानं विशिष्यते ” असें मनुवचन आहे. सध्यां उदकपूर्व कन्यादान होतें. पण सालंकार कन्यादान होत नाहीं. तेव्हां ह्याला ब्राह्मविवाह कसें म्हणतां येईल ? मासा दोन मास सोनें अगर रूपें अंगावर कन्यादा वेळीं ठेवल्यानें अलंकृत कन्येचें दान म्हणतां येणार नाहीं. ही नुसती फसवणूक आहे. आतां हुंड्याच्या नांवाखाली पैसे उकळणारे पशुसम वर- पिते जोंपर्यत समाजांत आहेत तोपर्यंत हा फसवाफसवीचा प्रकार

१४