पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३ संस्कार की सोहळा.


सोहाळ्यांचे जळमट चिकार पसरल्यामुळे आंत गुरफटलेला धार्मिक संस्कार कोणालाच दिसेनासा झाला आहे. विवाह हा संस्कार आहे. ज्ञान असणारा जाडा विद्वान् मानला जातो अशी स्थिति येऊन ठेपली आहे. मिरवणुकी व मेजवान्या याच्या दंगलीत बिचाऱ्या अग्नीची वास्तपुस्त कोण करणार? " विचित्राः खलु वासनाः”. धर्मप्रवणतेची जागा सुखलोलुपतेनें पटकावली म्हणजे दुःखांत पर्यवसान होणार हे ठरलेलेच. म्हणून अनावश्यक आचारांना फांटा देऊन धर्मविधि पाळण्याचा प्रयत्न केला तर त्रिवर्गसाधनाचे यश संपादितां येतें. विवाह म्हणजे काय ह्याचा उद्बोध झाला म्हणजे आवश्यक व अनु- षंगिक विधि यांची विभागणी करणे फारसे अवघड नाहीं. वाग्दान, कन्या- दान आणि होम हीं: विवाहाचीं मुख्य अंग होत. पण त्यांतहि आणखी विचार केला तर असें दिसून येईल कीं, कन्यादानपूर्वक होम म्हणजेच विवाह. इतर कृत्यांप्रमाणें वाग्दान हेंहि विवाहांगभूत आहे. निदान संकल्प तरी तसा सोडतात. पण एका दृष्टीने पाहिलें असतां वाग्दान हें विवाह-- विधीपासून अलग, स्वतंत्र असें आहे. आणि म्हणूनच आश्वलायन गृह्य -- सूत्रांत वाग्दानाचा समावेश केलेला नाहीं. 'वाभिश्चय झाल्यावांचून विवा• हच संभवत नाहीं. ' हें नारदस्मृतीतलें वचन यथार्थ आहे, (स्त्रीपुंसयेोस्तु संबन्धे वरणं प्राग्विधीयते । वरणाद् ग्रहणं पाणेः संस्कारो हि द्विलक्षणः ॥). तथापि वाग्दान हा कांहीं संस्कार नाहीं हें निश्चित. हल्ली सोडमुंज मुंजी- बरोबरच उरकून घेण्याचा प्रघात पडला आहे, अशा स्थितीत

१३