पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

घातला आहे यांत संशय नाहीं. लग्न म्हणजे काय ह्याची कल्पनाहि आमच्या सुशिक्षितांना नाहीं. विवाह म्हणजे कन्यादान जो करतो त्याच्या- चकडे मुख्यतः सर्व कृत्य असें असून वराचा बाप वधूकडील मंडळीस आपल्या गांवीं खेचून आणून लग्न लावण्यास भाग पाडतो हें किती आश्चर्य ? एखाद्यानें आपलें घर दान करण्यास निघावें, पण दान घेणारानें आग्रह धरावा कीं, ' मी तुझ्या घरी येणार नाहीं. माझ्या घरी येऊनच तूं माझ्या हातावर उदक सोड' असें उद्दामपणाचें उत्तर देणाऱ्या प्रतिग्रह `घेणाऱ्या ब्राह्मणाहून मुलाचा सुशिक्षित वाप अधिक सालस ठरेल काय ?








१२