पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विवाहपद्धतिः–पढतमूर्खाचे आचार.

आपल्या हातानें आपल्या तोंडाला अपशकुनाचें काजळ फांसून घेतो. पण शिवाय हीं वायें लावून आम्हीं पूर्वी मुसलमानांचे गुलाम होतों, सध्यां इंग्र- जांचें गुलाम आहों असें आढ्यतापूर्वक वाजतगाजत निर्लज्जपणानें जगजाहीर करतों असें होत नाहीं काय ? पण इतका विचार कोणी करावा ? कोण ही अभिमानलुप्तता ? आतां आमचें स्त्रीदाक्षिण्य पहा. मुलाच्या बापाने मुलीस पाहण्यास बोलाविलें नाहीं तर मग मुलाचा बाप वनण्यांत अर्थ काय ? आगगाडीच्या खेचाखेचीत, रात्रीचें जागरण करून आज येथें तर उद्यां शंभर मैलांवर असा प्रवास उपवर झालेल्या मुलींना करावा लागला म्हणून त्याची थोडीच खंत मुलाच्या बापाला वाटणार ! स्त्रीदाक्षिण्य हा विषय घेऊन अघळपघळ व्याख्यान देण्यास पुनः तयारीच. पूर्वीचे “अशिक्षित" लोक मुलीला आपलें घर सोडावयास लावणें हें अकुलीनतेचें लक्षण सम- जत. पण सध्यांच्या शिक्षितां "च्या कुलीनताविषयक कल्पनाहि विकल्प पावल्या आहेत. विवाह मुलीकरितां आहे. मुलाला त्याची आव- श्यकता बिलकूल नाहीं अशा समजुतीवर आम्ही सध्यांच्या चालींची उभारणी केली आहे. हुंड्याचीच गोष्ट घ्या, मुलाच्या बापाने असा कोणता पराक्रम केला असतो कीं, मुलीच्या बापाकडून त्यास पैसे उकळण्याचा हक्क उत्पन्न व्हावा ? हुंडा घेण्याचा मोह कोणासहि सुटत नाहीं. ही एकच गोष्ट आमच्या शिक्षणाचें वैय्यर्थ्य सिद्ध करण्यास पुरेशी आहे. हुंडा घेतला नाहीं तर पाप घडत नाहीं, अधर्म होत नाहीं, कोणी वाळीत टाकीत नाहीं. असें असून सुद्धां ज्यांना हा पेंढारीपणा करण्यांत भूषण वाटतें त्यांनी आपआपले डिप्लोमा समुद्रांत एकदांचे वुडवून तरी टाकावेत. हुंड्याच्या विरुद्ध ठराव करणान्या सामाजिक सभांचें किती सभासद ठरा- वाची अंमलबजावणी करणारे आढळतील ? "दोष ठेवी पुढिलासी । तेचि स्वयें आपणांपासी ॥ ऐसें कळेना जयासी । तो एक पढतमूर्ख ॥ " असें पढतमूर्ख दरवर्षी शेंकड्यांनी बनविण्याचा कारखाना विश्वविद्यालयानें

११