पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

मुलांनीं मुलगी पाहणें म्हणजे पाप होय असें कांहीं कोणी म्हणत नाहीं. पूर्वीच्या काळी सुद्धां वधूनिरीक्षणविधि करण्याची आवश्यकता भासली, तर आधुनिक कालीं ती अधिकच तीव्रतेनें भासणार. एकादा द्रव्यलोभी बाप आपल्या सुलक्षणी मुलाच्या गळ्यांत एकादी घोरपड बांधणार नाहीं कशावरून ? पण हें अपवाद होत. असले प्रकार कितीहि निंद्य असले तरी निदान विस्मयावह नाहींत. परंतु स्वातंत्र्याचें, सुविचारांचें आगर म्हणून गर्जत असलेल्या ख्रिस्ती राष्ट्रांत प्रत्यक्ष तरुणतरुणी आपण होऊन आपल्या गळ्यांत केवळ पैशाकरितां घोरपडी बांधून घेतात मात्र विशेष आश्चर्यकारक खरे; असो. मुलगी पाहणें म्हणजे सामान्यतः तिचें स्वरूप पाहणेंच होय. तिच्या गुणांचे मापन करण्यास सध्यां तरी कोणतेंहि साधन उपलब्ध नाहीं. व त्यामुळेंच विवाह म्हणजे जुगार अशी यथार्थ समजूत होत चालली आहे. रूपाप्रमाणे कन्येचे शील व बुद्धि पहाण्याविषयीं शास्त्रकारांचा आग्रह आहे, पण " दुर्विज्ञेयानि लक्षणानि " असे निराशाद्योतक उद्गार त्यांनींच काढले आहेत. आमच्या गप्पांमध्यें असंख्य उपाय सुचविले गेले, पण अखेरीस सूत्रकारांबरोबर आम्हांलाहि हात टेकावे लागले. विवाहानंतर " गृहिणी सचिवः सखी मिथः प्रिय- शिष्या ललिते कलाविधौ " असें पुरुषाला आपल्या सहचरीसंबंधानें म्हणतां यावें, त्याचप्रमाणें पिता सोडून पति वरल्यावर 'अहो वृत्तमहो रूपमहो धनमहो कुलं' असे इलेप्रमाणें नवपरिणत वधूच्या मुखांतून हर्षोद्गार निघावे अशी अपेक्षा प्रत्येकजण करणार. पण ह्या सुखाच्या शोधाचा हव्यास सोडून देऊन आमचा वाक्प्रवाह विवाहांगभूत व्यावहा- रिक आचारांकडे वळला.
 आमच्या लग्नांतील सध्यां शिष्ट मानल्या जाणाऱ्या चालींवरून अभि- मानशून्यतेचे व बेअकलीपणाचे बिनचूक माप करतां येतें. मंगल कार्या- मध्यें ताशा बेणबाजांसारख्या रणवाद्यांचा उपयोग करून आपणच

१०