पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विवाहपद्धतिः - प्रेम की भक्ति ?

चा अनुभव येतो. ह्याव्यतिरिक्त प्रेम ही वस्तु कोठेंहि अस्तित्वांत अस- लेली आढळणार नाहीं. ह्या नाटकी व फोल प्रेमाचा वावर नाटक कादं- बयत ठीक आहे. व्यवहारांत उपरिनिर्दिष्ट अपवाद खेरीज करून प्रेमाला कोठेंहि ठाव नाहीं. आपण ज्याला प्रेम समजतों, तें वस्तुतः प्रेम नसून ती केवळ कामासक्ति, विषयलोलुपता होय. खरें प्रेम अव्यभिचारी असतें. मग प्रेमावगुंठित युग्माचीं शकलें कशी होतात ? तसेंच प्रेम हैं निरक्षेप आहे. मातेचें प्रेम अर्भकाच्या प्रेमावर अवलंबून नसतें व प्रेम- भाव त्या अर्भकांत जागृतहि झालेला नसतो. पण विवाहांत पुरुषाचें स्त्रीवर आणि स्त्रीचें पुरुषावर असें उभयविध प्रेम असेल, तरच तो प्रेम- प्रेरित विवाह म्हणतां येईल. पण ही गोष्ट शक्य तरी आहे काय ? प्रेम हें सहज असतें, किंवा आगंतुक असतें ? सहज असणें शक्यच नाहीं. मूल जन्मल्याबरोबर मातेच्या स्तनांत ज्याप्रमाणें दुधाचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणें तिच्या मनांत मुलाविषयीं प्रेमोद्भव होतो. असा प्रकार वैवा- हिक प्रेमाच्या संबंधानें घडणें संभवत नाहीं. पंगु बालकाला आईच्या निरपेक्ष प्रेमाची ज्याप्रमाणे जरुरी आहे, त्याप्रमाणें स्त्रीपुरुषांची पदरगांठ बांधण्यास नाहीं. ह्या कार्याकरितां परमेश्वरानें कामदेवाला मुद्दाम सृष्टीच्या आधीं निर्माण केला. त्याच्याकडून तें कार्य नीट होत असतां प्रेमाची योजना करण्याचें परमेश्वरास प्रयोजन काय ? तात्पर्य प्रेम हा विवाहाचा पाया ठरत नाहीं. स्त्रीपुरुषांचें परस्पर प्रेम त्यांच्या जन्मावरोबरच जर विधा- त्यानें उत्पन्न केलें असेल, तर प्रत्येक स्त्रीपुरुषानें सर्व जगभर आपलें प्रेम- पात्र हुडकून काढण्यांत हिंडलें म्हणजे झालें. ब्रह्मदेवानें योजलेल्या वधू- वरांची दृष्टादृष्ट होतांच दोघांच्या अंतःकरणाला प्रेमाची पालवी फुटून, आपणच तीं, अशी ओळख पटून एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यांत माळ घातली म्हणजे झालें. पण असें स्वयंभू प्रेम जर असतें, तर कोटिंगची आवश्यकता कोठें होती ? म्हणून आमच्या विवाहांत प्रेमाला अवसर