पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रास्ताविक.

अलोट वाक्प्रवाहाकडे पाहून मत्सरच उत्पन्न होत असला पाहिजे. आमचा चर्चा प्रदेश अमर्याद. कोणत्याहि विषयाची वगळ नसे. शिवाय चारचौघांत जाहीरपणे बोलावयाचें म्हणजे आपणांस वाटतें तें न बोलणें व वाटत नाहीं तें बोलणें हा समाजमान्य नियम अगर शिष्टाचाराचा धिंगाणा ह्यांच्या पायीं आमच्या मतांची कुचंबणा होण्याचें कांहींच कारण नसल्यामुळे, आमची जिव्हा मनोनिष्ठ राहिली ह्यांत कांहीं विशेष नसलें, तरी अशा वाणीची योग्यता फार आहे हे सांगावयास नको. लोकांना रुचेल असेंच बोलणारी वाणी आणि “ वितथैश्चित्ततोषणम्" हें आहे ब्रीद जिचें, अशी वाजारबसवी ह्यांमध्ये मोठ्या कायदेपंडितालाहि भेद दाखवितां येणार नाहीं. मनोनिष्ठ वाणीची तुलना पतिनिष्ठ कुलांगनेशांच करतां येणें शक्य आहे. बरें, ही वाणी नुसती दांभिक नव्हती इतकाच तिच्यांत गुण होता असें नाहीं, तर ती अर्थवतीहि असण्याचा संभव आहे. कारण खेड्यांतील शांत वातावरण गंभीर विचारांची जननीच होय. अलौकिक बुद्धिमत्तेचा उदय शहरांत क्वचितच झाला आहे असें समाज- शास्त्रवेत्ते म्हणतात तें कांहीं अगदींच मिथ्या नव्हे. जगांतील सर्व धर्मांची प्रेरणा रानावनांत व डोंगरांतच झाली नाहीं काय ? ह्याहीपेक्षां चमत्कार म्हणजे सर्व धर्मसंस्थापक निर्जन प्रदेशांतील विद्या-अदूषित अशी साधी- भोळींच माणसें नव्हतीं काय? मोठमोठे शोध गांवढ्यांत लागले,अगर शहरांत `राहून लागले ? तात्पर्य गांवढ्याकडे क्षुद्र दृष्टि करून कधींहि चालावयाचें नाहीं. गांवढ्यांत धीरोदात्त विचारांना मोल नसले, तरी अशा विचारांची पैदास तेथेच होते खास. पण हा नियमच आहे. शेतकरी गांवढ्यांत धान्य पिकवतो; पण त्याचें मोल होण्यास तें शहरांतच न्यावें लागतें. सर जग- दीश बोस ह्यांना आपल्या शोधांचें गांठोडें सोडावयास विलायतेस जावें लागते. येथें सोडूं पाहतील तर 'गांवढ्यापुढें वाचली गीता आणि कालचा -गोंधळ बरा होता' असा प्रसंग त्यांच्यावर ओढावयाचा. असो. सांगाव-