पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

येनकेन प्रकारेण वा यत्रकुत्र नांव आणण्याची ओढाळ हौस ज्यांना नाहीं, अशा सुशील पण विनडोली शिक्षितांच्या मनाची धांव गांवढ्याकडे असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे माझ्या दोन विचारशील व भूरिश्रुत मिलांचा सहवास मला महिनाभर घडला ह्याचा आनंद वाटतो. एक दिलाची माणसे एकत्र आली म्हणजे आनंदलहरींबरोबरच चर्चालहरीहि उसळ्या मारूं लागतात. तिसऱ्या प्रहरीं चार वाजतां चहाच्या पेल्यांचा चित्ता- कर्षक पण प्रकृतिविध्वंसक नाद कानावर पडतांच आम्हीं दररोज दिवाण- खान्यांतून उठून गच्चीवर वैठक मारीत असूं. उन्हाळ्यांत अमित्र बनलेल्या मित्राचा ताप निवारण करण्यास आच्छादित गच्ची समर्थ असल्यामुळे पंख तोडलेल्या पक्ष्याप्रमाणें सूर्याची केविलवाणी स्थिति पाहून,, . मानवी कर्तव- गारीच्या अभिमानानें क्षणभर चहाचेंहि आम्हांस विस्मरण होई. मृत राष्ट्राला साजेशी पश्चिमाभिमुखच आमची बसणी असल्यामुळे एवढा प्रखरौजस रवि पण तो आमच्यापाशीं चहाची याचना करीत आहे असा भास होई. कावू पाहणाया पडत्या काळांत विचारा दुसऱ्या कशाची अपेक्षा कर- णार? असो, आमचा चहा म्हणजे साधें काम नव्हतें. तो आमचे दोन मिनिटांच्या ऐवजी दोन तास घेई. 'मूकं करोति वाचालं' असा आमच्या गच्चीमध्ये पराक्रम होता. अपरिमित, अप्रतिम व ओतप्रोत सभोंवार भरलेलें सृष्टिसौंदर्य, सरित्संपर्कानें आई व प्रसन्न झालेला मंदगति वायु, वाहनादिकांचा कल्लोल व असंख्य लोकसमूहाचा गलबला ह्यांच्या योगानें शहरांत कदापि अनुभवास न येणारा निवांतपणा हीं वाक्कू- युत्पादक नाहींत असें कोण म्हणेल? नियमानें दररोज दोन तास आम गप्पांत जात. वेळ कसा गेला ह्याचें आह्मांस भानहि नसे. कोरडवाहु जिभांना चहाचें वंगण मधून मधून मिळाले म्हणजे झालें; मग वाक्प्रवाहाला कांहीं कमतरता नाहीं. आमच्या घरापासून थोड्याशा अंतरावर नदी होती. पण उन्हाळ्यांतील त्या कृशतनूला आमच्या