पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

याचा हेतु इतकाच कीं, गांवढ्यासारख्या ठिकाणीं सद्विचारांचें स्फुरण होणें संभवनीय असल्यामुळें, आमच्या गप्पा म्हणजे अगदीच गटार- गप्पांच्या तोडीच्या नव्हत्या. वैशाखमास म्हणजे वधूवरांना विवाहपाशांन बद्ध करणारा मास, जगाचें सातत्य राखण्याचे प्रयत्न ज्या महिन्यांत होतात तो हा महिना, तेव्हां आमच्या गप्पांचा पहिलाच विषय आमची विवाहपद्धति हा होणें स्वाभाविक होतें.