पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रास्ताविक.

 न्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोर्ट कचेऱ्या बंद. तेव्हां ह्या सुटीचा फायदा घेऊन आपल्या शरीराला तशीच मनाला विश्रांति मिळावी म्हणून कोर्टाप्रमाणेंच घरेंहि सोडून मंडळी परठिकाणीं आपल्या स्नेह्या- सोबत्यांकडे जाऊन कांहीं दिवस राहण्याचा परिपाठ पडत चालला आहे तो सर्वथैव इष्टच आहे. त्यांत मी गांवढ्यांत राहणारा असल्यामुळे माझ्या स्नेह्यांनीं माझ्या निमंत्रणाला मान्यता देण्यांत तत्परता दाखविणें स्वाभाविकच आहे. गांवढ्यांत हवा स्वच्छ व शुद्ध जागेची विपुलता आणि शिष्टाचाराच्या बहाण्याने समाजांत मिरवणारे उमरावी आचार ह्यांचे लोढणें झुगारून देण्यास अनुकूल परिस्थिति, ह्या कारणांनी वर्तमानपत्रांत