पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

विनाकारण चुराडा होत आहे. विद्वत्ता नाहीं, शील नाहीं, वळण नाहीं, पैसा नाहीं. मग ह्या कॉलेज शिक्षणाकरितां आम्ही कां हपापतों ? इतक्या दिवस - नोकऱ्या मिळत होत्या म्हणून इतके दिवस निभावलें. शिवाय लहानपणापा- -सून आईबापांपसून दूर राहिल्यानें मुलांच्या मनांत मातापितरांविषयीं आपभाव राहात नाहीं. कुटुंबामध्यें तीं परक्यासारखी होतात. ममता नष्ट होतें. आपलेपणा रहात नाहीं. मग कुटुंबाचीं शकलें पडली तर त्यांत आश्चर्य तें काय ? एवढ्यावरच भागत नाहीं. कुलधर्म, कुलाचार, वर्णाश्रमाचार, ह्यांच्यापासून त्यांची फारकत होते. हिंदुसंस्कृतीला ती पारखी होतात. हिंदुत्वाचा अंकुरच करपून जातो. शिवाय खेड्यामध्यें जो खरा देश तो त्यांना अपरिचित होतो. त्यामुळे देशाची खरीखुरी स्थिति त्यांस समजत नाहीं. हें अज्ञान पुढे मोठेपणीं सार्वजनिक कार्याच्या आड येतें. सारांश कॉलेजांतील वसतिगृहें आमच्या मुलांना सर्वतोपरी नालायक बनवितात. आणि मुलांना नालायक करण्यास आम्ही अजागळ बाप हजारों रुपये खर्च करतो. हिंदुस्थानांत इंग्लिश लोक नुसते आले इतकेंच नाहीं तर त्यांनी हिंदुस्थानांत इंग्लंडच आणले आहे. सारांश, शिक्षण म्हणजे बिनमोबदल्याची बेताल रहाणी; बेताल राहणी - म्हणजे विलायती मालाचा खप; आणि विलायती मालाचा खप म्हणजे अधिक दारिद्र्य; अशी ही सारणी आहे. हिंदुसमाजानें बाष्कळ अनुकरण कर- ण्याचे सोडून आपलें घर एकदां तपासून पाहण्याचा काल आला आहे, असा आमच्या गप्पाकारांच्या गप्पांचा आशय दिसतो. पुष्कळांची असले विचार ग्रहण करण्याची अद्यापि तयारी नाहीं. त्यांना ग्रहांच्या वक्रगतीप्रमाणेच ह्यांत प्रदर्शित केलेल्या विचारांची गति वाटेल. अकाली “ सत्यवाक्यमपि नोच्चरणयम् ” खरें पण इतकीच विनंति करावयाची कीं विचार करा, मनन करा आणि मग “येनेष्टं तेन गम्यताम् ”.


१२