पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गणमैत्री आणि राक्षसांचा महादेव.

घडे तरी मनुष्यांना देवांनी देव ही संज्ञा लावली नाहीं. अर्थातच त्यामुळे सर्व पृथ्वीवर तीन गण अथवा समाज झाले: देव, मनुष्य, आणि राक्षस. राक्षसांशी शरीरसंबंध न करण्याचें देवांनी ठरविलें त्याप्रमाणे त्यांचें अन्नहि ग्रहण न करण्याचे ठरविलें पाहिजे. मनुस्मृतीत (. अध्याय ४ श्लोक २०९ ) गणान्नभक्षण करण्यासंबंधानें निषेध आहे. " गणानं गणिकान्नं च विदुषां च जुगुप्सितम् ” हें गणान्न म्हणजे राक्षसांचे अन्न असेल काय ? हीन संस्कृतीच्या लोकांतील मुलगी वरिष्ट संस्कृतीचे लोक करीत. पण याच्या उलट प्रकार फारसा घडत नसे. वृषपर्वा दैत्याची कन्या शर्मिष्ठा हिचा ययातीबरोबर विवाह झाला. कृष्णाचा नातु अनिरुद्ध यानें बाणासुराची कन्या उषा हिचें पाणिग्रहण केलें. भीमानें हिडिंबा बायको केली. अर्जुनानें उलूपी या नागकन्यैवरो- वर विवाह लावला. दैत्य कंस हा कृष्णाचा मामा हैं प्रसिद्धच आहे. जरत्कारु ब्राह्मणानें सर्पजातीय वासुकीच्या बहिणीला वरिलें. पण विरुद्ध उदाहरणें फारशीं नाहींत. देव, मनुष्य, आणि राक्षस हे सर्व पुढें एक झाले यांत संशय नाहीं. पण देवराक्षसांमधली देवघेव उभयपक्षी असावी. त्यांनीं आपला महादेव देवांच्या गळी उतरविला, पण देवांनी दानवांना वेदानुयायी केलें नाहीं काय ? हल्लींचा आमचा सांव म्हणजे वैदिक रुद्र अथवा शिव, राक्षसी हर आणि लिंगायतांचे लिंग, असें कड बोळें आहे. एकीकरणाचे हे प्रकार अर्वाचीन सुधारकांनी मनन करण्या- सारखे आहेत एवढें मात्र खरें.
 देवलोकाहून राक्षसांचा प्रदेश निराळा होता. नागलोकाच्या मध्य- भागी दैत्यदानवांनीं वसलेला पाताळनामक सुप्रसिद्ध भूभाग आहे असें महाभारतांत वर्णन आहे. (उद्योगपर्व . ) पण हैं पाताल म्हणजे रसातल नसावें. कारण रसातल म्हणून सातवें भूमितल आहे असें पुढें याच पर्वात नारदांनी मातलीस सांगितलें आहे. असें जरी आहे तरी मत्स्य-

९७