पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

आहेत ( भागवत ). हिरण्याक्ष, हिरण्यकशिपु, रावण, बली वगैरे दानक बलिष्ट असून त्यांची साम्राज्ये होती.
 या सर्व समाजांत थोड्याबहुत प्रमाणानें विवाहसंबंध घडत असत. राक्षसांसारखे जे लोक देवांना वश झालें नाहींत त्यांच्याबरोबर असे संबंध न होणें स्वाभाविक होतें. इंद्राचा सारथि मातलि हा नारदावरो- बर वरसंशोधनार्थ सर्व पृथ्वभिर हिंडला. त्यानें नागजातीचा वर आपल्या कन्येकरितां पसंत केला, पण राक्षसपुत्र नाकारला. मातलीने नारदाला सांगितलें, देव आणि राक्षस यांचे वैर सदैव चालू असतां शत्रूबरोबर संबंध करणें मला आवडत नाहीं. देवांना ही गोष्ट रुचणार नाहीं. आणि देवांना अप्रिय असें मी कधी करणार नाहीं.
देवर्षे नैव मे कार्यं विप्रियं त्रिदिवौकसाम् । नित्यानुषक्तवैरा हि भ्रातरो देवदानवाः। परपक्षेण संबन्धं रोचयिष्याम्यहं कथं " (म. भा. उ. पर्व )
 मातलीच्या या आख्यानावरून एवढें व्यक्त होतें कीं देवसंस्कृतीचें अनुयायित्व मान्य करणारे लोक देवांत मिसळून गेले. त्यांची मैत्री झाली; त्यांचें संबंध जडले. राक्षसांची मात्र प्रतिक्रिया गुरू झाल्यानें ते अमित्र झाले. त्यांच्याबरोबर देवांची किंवा मनुष्यांची गणमैत्री कशी जमावी ? विवाहघटितांतील गणमैत्रीचें मूळ कोठें आहे हे आतां सहज समजण्यासारखें आहे. गण म्हणजे लोकसमूह, - जात. गणमैत्री पहाणें म्हणजे आपल्या अथवा आपल्याला मान्य अशा समाजापैकीच वधूवर आहेत अगर परसमाजांतील आहेत हे पहाणे. मूळ देवांची संस्कृति. देव हे उत्तरेकडून आले. खाली आल्यावर ज्यांनीं त्यांची संस्कृति मान्य केली ते मनुष्य आणि ज्यांनी विरोध केला ते राक्षस असे असण्याचा संभव आहे. असुर आणि राक्षस यांच्याशिवाय बाकीच्या समाजांकडून देवांना विरोध फारसा झालाच नाहीं. मनुष्यांचा मूळ पुरुष मनु. जेते देव, जित जेवढे तेवढें मनुष्य. देवांचा आणि मनुष्यांचा शरीरसंबंध

९६