पान:गच्चीवरील गप्पा.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

पुराणांत आमचा येथें कोणी त्राता नसल्यामुळे आम्ही आतां रसात - ळाला जातो असें दैत्य शुक्राचार्यास सांगतात. “ स्थातुं न शक्नुमो ह्यत्र प्रविशामों रसातलम् ” ( अ. ४७ श्लोक ६०). पण लगेच पुढे देवांनी आम्ही ह्या दैत्यांना वळजबरीनें पाताळांत हाकलून लावू असें म्हटलें आहे: “ प्रसह्य हत्वा शिष्टांस्तु पातालं प्रापयामहे ". पातल व रसातल हे एकच भूप्रदेश आहेत अशी चुकीची समजूत पुढे झाली असावी असें दिसतें. कांहीं असो, सप्तपाताळांत दैत्यांची वस्ती होती हैं खास. हा भूप्रदेश काल्पनिक नव्हता. भागवतांत सुद्धां " ततोऽधस्ताद्रसातले दैतेया दानवा... हिरण्यपुरवासिनः " म्हणजे रसातली हिरण्यनगरांत दैत्य दानव रहातात, असें वर्णन आहे (स्कं. अ २४ श्लो. ३० ). सारांश, देवलोक, मनुष्यलोक आणि दानवलोक हा नुसता कल्पनेचा बाजार नव्हे. शतकोटिपुराण देवलोकांत अद्यापि आहे; कार्तिकस्वामींनी सांगि- तलेल्या पुराणास मनुष्यलोकांत स्कंदपुराण म्हणतात; रसातली विष्णूंनीं कूर्मपुराण सांगितलें; वगैरे वचनांचा अर्थ शब्दशः च घेणे अवश्य आहे. देवलोक म्हणजे आकाशांतील स्वर्ग असें समजणे चुकीचें होय. असो.
 महादेवाच्या वर्णनावरून तो अनार्यांचा देव असावा. हल्ली सुद्धां शंकराची पूजा अनार्यांच्याच हातीं आहे. श्रीशैल येथें परिया लोकांनी देवाची पूजा केल्यावर मग ब्राह्मण देवळांत जातात अशी वहिवाट आहे. विष्णूचा पुजारी ब्राह्मण असावाच लागतो. पण शंकराचा पुजारी ब्राह्मण क्वचित् सांपडतो. अनार्थ देवाचे महत्त्व फार वाढलेलें कट्टर वैष्णवांना न रुचणें स्वाभाविक आहे.
 हल्ली जन्मनक्षत्रावरून ज्योतिषशास्त्रांत गण ठरविले जातात. हा कल्पनेचा खेळ आहे किंवा गणनक्षत्रसंबंध सोपपत्तिक आहे हे समज- ण्यास मार्ग नाहीं. पण गणांची वर सुचविलेली उपपत्ति जर खरी असेल तर हा गणनक्षत्रसंबंध काल्पनिकच मानला पाहिजे. कोणतें जन्मनक्षत्र

९८