पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गणमैत्री आणि राक्षसांचा महादेव.

करण्यांत आले, पण जंगली महादेवाला आम्ही आपल्या डोक्यावर बसवला यांत कांहीं खोटें नाहीं.
 ब्रह्मा, विष्णु, व महेश हे तीन समाजांचे तीन देव होते. देवांचा विष्णु, मनुष्यांचा ब्रह्मा व राक्षसांचा महेश. जसे समाजांचे गुण तसेच त्यांच्या देवांचेहि. देव हा समाज सत्त्वप्रधान तर मनुष्य व राक्षस हे अनुक्रमें राजस व तामस होते. मत्स्यपुराणांत (अ. ५३ श्लोक ६७-६८ ) विष्णु सात्विक, ब्रह्मा राजस व महेश तामस असें वर्णन आहे. तीन समाजांचें एकीकरण झाले तेव्हां ब्रह्मविष्णुमहेश असा सर्वांचा त्रिमूर्ति देव बनवावा लागला. एकीकरणाचे शिकस्तीचे प्रयत्न झाले तरी हैं विष्णुमहादेवाचें भांडण पुष्कळ वर्षे चालूं होतें. हिरण्यकशिपु व प्रल्हाद या पितापुत्रांत मुलाने विष्णूची उपासना स्वीकारली म्हणूनच कलह माजला. वैष्णव व शैव यांच्यांत अद्यापहि हाडवैर कां वसत आहे हें आतां आपणांला नीट समजेल. देव, मनुष्य, गंधर्व, नाग, गरुड, पिशाच, राक्षस हे सर्व निर- निराळे समाज होते. वेदाभिमानीहि ते समाज असावेत. कारण रावणानें वेदांचीं खडें केली अशी आख्यायिका आहे. देवांनी सर्व समाजांत वैदिक संस्कृतीची छाप बसावी म्हणून प्रयत्न चालविले होते. गरुड हे देवांना लवकर वळले, ते विष्णुभक्त बनले. “ दैवतं विष्णुरेतेषां विष्णुरेव परा- यणम् । हृदि चैषां सदा विष्णुर्विष्णुरेव सदागतिः ॥ ( महाभारत, उद्योग- पर्व ). विष्णूचें वाहन गरुड हैं देवांनीं गरुड नांवाच्या लोकांवर मिळवि- लेल्या जयाचे सूचक आहे. राक्षसांनी मात्र देवांना कसून विरोध केला आणि आपला महादेव त्यांनी अखेरीस देवांवर लादलाच. नाग, सर्प, गंधर्व इत्यादि समाजांबरोबर देवांना फार लढावे लागलें नाहीं. पण राक्षसांनी शत्रुत्व फार दिवस चालविलें म्हणून "सुरशत्रूणां दैत्यदानवरक्षसाम्” (वायु- पुराण) असें वर्णन सर्वत्र आढळतें. दानव महान पराक्रमी होतें. “महौ- जसः" " महासाहसिनः " अशीं विशेषणें पुराणकारांनी त्यांना लावलीं

९५