पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

ज्याच्या प्राणघातक शास्त्राच्या तडाक्यांतून देव किंवा मनुष्य यांपैकी कोणीहि सुटत नाहीं.
 या सर्व अवतरणांवरून देव आणि मनुष्य असे मानवी अथवा मर्त्य समाज होते असे सिद्ध होतें. काठकसंहितेंत तर पृथ्वीवर राहणारे, यज्ञ विध्वंस करणारे व यज्ञांत चोरी करणारे असें देवांचें वर्णन आहे. हें वर्णन देवांना लागू पडणारें नाहीं हें सांगावयास नको.
 राक्षसांचाहि समाज होता हें राक्षसांचें जें पुराणांत वर्णन केलेलें आहे त्यावरून सिद्ध होतें. असुर आणि राक्षस एक नव्हत. दोघांना एकच समजण्यांत पुराणकारांनीं चुकी केली आहे. असुर हे देवांप्रमाणें यज्ञ करणारे होते. पण राक्षस यज्ञ करणारे नसावेत. क्वचित् ठिकाणीं ( उ. रामायण ) यज्ञाचा व राक्षसांचा संबंध जोडण्यांत येतो. पण अशीं स्थलें संशयास्पद मानण्यास जागा आहे. किंबहुना यज्ञ करण्याचें बंद पडल्यानंतर देव आणि राक्षस यांचा संबंध आला असावा. देव आणि 'असुर यांचा लढा यज्ञासंबंधीं असे; पण देव आणि राक्षस यांचें वैमनस्य उपास्यदेवतेवरून पडलें होतें. मूर्तिपूजा अथवा देवपूजा सुरू झाल्यावर देवराक्षसांचा संयोग झाला. अथवा इंद्र व वरुण या देवतांसंबं- धानें देवासुरांत वितुष्ट असे; तर देवराक्षसांत विष्णु आणि महादेव या देवतांवरून भांडणें होत. राक्षसांचा देव महादेव अथवा शंकर. म्हणून दस्यु आणि राक्षस हि एक नव्हत. अकर्मन्, अदेवयु, अत्रत, अब्रह्मन्, अयज्यु असें दस्यूंचें वर्णन ऋग्वेदांत केलें आहे. पण रावण मोठा तपस्वी होता हैं सर्वास विदितच आहे. महादेव हा मूळचा वैदिक देव नव्हे. विष्णु हा वैदिक देव होता. पुढें राक्षसांनी आपले वर्चस्व चांगलेंच स्थापिलें. शंकराचें व्रत म्हणजे कधी सुटतां कामा ये. विष्णूची एकादशी मध्येच सोडली तरी चालेल, पण शिवरात्र सोडल्यास महादोष मानला जातो. हरिहरांचें ऐक्य दाखविण्याचे अटोकाट प्रयत्न

९४