पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गणमैत्री आणि राक्षसांचा महादेव.

कीं, देवांना मनुष्यकन्या पतकरे पण राक्षसकन्या पतकरत नसे. राक्ष- सांशीं एकरक्त होण्यास देव तयार नव्हते. मनुष्यगणाचा वर आणि राक्ष- सगणाची वधू अथवा राक्षसगणी वर आणि मनुष्यगणी वधू यांना वधूवरांच्या घटितांत शून्य गुण आहे. यावरून मनुष्य आणि राक्षस यांचा कोणत्याहि प्रकाराने विवाहसंबंध होऊं नये असा हेतु असावा असें उघड दिसतें. राक्षसगणाच्या मुलाला देवगणाची मुलगी केली तरीहि गुण १ च, याचा अर्थ असा दिसतो कीं देवांनी राक्षसांवरोवर संबंध करण्यास थोडथोडी सुरुवात केली होती, पण मनुष्यांनी तसें कर- याचें नाकारलें.
 देव, मनुष्य आणि राक्षस असे तीन समाज पूर्वी होते. हे तीन निर- निराळे मानववंश असावे. हा सिद्धांत जर खरा ठरला तर जुन्या पुष्कळ गोष्टींचा उलगडा चांगल्या रीतीने करतां येण्यासारखा आहे. राक्षस हा निराळा लोकसमूह होता ही गोष्ट पुष्कळांना पटेल; पण देव आणि मनुष्य या नांवाचे दोन समाज होते याला पुष्कळांकडून लवकर मान्यता मिळणार नाहीं. ह्मणून तत्संबंधी प्रमाणें देणें आवश्यक आहे.

'यथा वा इदं मनुष्या उपासत एवमेतं देवा उपासत "

( काठकसंहिता ८

मनुष्यांनी ज्याप्रमाणें याची उपासना केली त्याचप्रमाणे देवांनीहि केली.
“त्वमस्माकं नाम मा देवानां तन्तुश्छेदि मा मनुष्याणाम् ” (का. ९/९/९ )
तूं आमचा आहेस. देवांचा व मनुष्यांचा वंश न तुटो."
"इन्द्रस्य कुक्षिरसि सोमधान आत्मा देवानामुत मानुषाणाम्"

( अथर्ववेद ७

देवांचा आणि मनुष्यांचा तूं आत्मा आहेस.
" ययोर्वधान्नापपद्यते कश्चानान्तदेवल मानवेषु

(अ. वेद ४२८५)