पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गणमैत्री आणि राक्षसांचा महादेव.

धूवरांच्या कुंडल्या पहातांना गणगोत्राला प्राधान्य असतें. गणगॊत्र जमल्यास अधिक न पहाणारे लोक पुष्कळ आहेत. म्हणजे त्यांनी विशेष पाहिलें नाहीं तरी ते गणगोत्र बघतातच. त्यांतहि गणापेक्षां गोत्राचें महत्त्व विशेष. गणांकडे दुर्लक्ष्य झालेलें एक वेळ खपेल पण सगोत्र विवाह कोणीहि होऊं देणार नाहीं. तथापि गोत्र जुळविण्यासंबंधानें कांहीं गूढ नाहीं. कुटुंबांतल्या कुटुंबांत विवाहसंबंध घडूं नये, तसें होणें अनिष्ट आहे, अशी प्राचीनांची समजूत होती. तेव्हां वधूवरांचीं गोत्रें पाहणें हें सकारण आहे ही गोष्ट आपल्या मनाला पटते. परंतु गण पहा- याचें प्रयोजन काय या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण पडतें. आमचा असा तर्क आहे कीं, गोत्र हा जसा कुटुंबविषयक, तसा गण हा जातिवंशविष- यक प्रश्न आहे. निदान प्रथम त्याचें हेंच स्वरूप असले पाहिजे.
 देव, मनुष्य आणि राक्षस असे तीन गण असतात हे सर्वांना माहितच आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणें वधूवरांचा एकच गण असला तर ६ गुण येतात. तसेंच वर देवगणी असून वधू मनुष्यगणी असली तरीहि ६ गुणच मिळतात. पण देवंगणी वराला राक्षसगणी वधू पाहिली तर १ गुण मिळतो. अर्थात या दोघांचा संयोग कमी प्रतीचा मानला गेला. आतां मनुष्यगणी वराला देवगणी कन्या दिली तर ५ गुण ठेवले आहेत. म्हणजे हाहि संबंध पहिल्या प्रतीचा लेखला गेला नाहीं. हा सर्व प्रकार प्रतिलोमविवाहासारखाच दिसतो. म्हणजे ब्राह्मणेतराची कन्या करण्यास दोष नसे, पण ब्राह्मणेतर वरानें मात्र ब्राह्मण वधू करूं नये, असा शास्त्र- निर्बंध होता. आतां चातुर्वण्र्यांत ब्राह्मणाला शूद्रकन्येशी लग्न लावण्यास कांहीं काल तरी प्रत्यवाय नव्हता. पण वरील गणांगुणांवरून असें दिसतें

९२