पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिवाशीव.

बाबतीत असाच एक वेडगळ समज रूढ झाला आहे. मोठ्या तापांत स्त्रियांना साधारणतः रजःस्राव होतो. अशा वेळीं शुद्धाशुद्धतेच्या अवा- स्तविक कल्पनांनी घेरलेल्या स्त्रिया आपलें बेसुमार हाल करून घेतात. पण आमचे शास्त्रकार कांहीं इतके व्यवहारशून्य व मूढ नव्हते. ते म्हणतात “रोगेण यद्रजः स्त्रीणामत्यर्थं हि प्रवर्तते । अशुद्धास्ता न तेन स्यु- स्तासां वैकारिकं हि तत् ” हें वचन धुपणीपुरतेंच आहे असें नाहीं. विकारयुक्त रजःस्राव जेवढा असेल तेवढ्याचा ह्यांत समावेश होतो. सारांश, आमच्या धर्माचें तत्त्वच हैं आह कीं, कष्टमय स्थितीत धर्माचरण करूं नये. शरीर संभाळणे हाच अशा स्थितीत धर्म होय. देशभने प्रवासे वा व्याधिषु व्यसनेष्वपि । रक्षेदेव स्वदेहादि पश्चाद्धर्मं समाचरेत् ॥ ह्या तत्त्वाचा विसर पेशवाईत सुद्धां लोकांना पडला होता. स्मृतिग्रंथांत सांगितलेले आचार हे शारीरिक व मानसिक शुचिर्भूतपणा उत्पन्न कर- तात. स्वर्ग अथवा मुक्ति हैं त्यांचें फल नव्हे. म्हणून " धर्म " पाळण्या- करितां देहाचे हाल करणें केव्हांहि न्याय्य होणार नाहीं. करतां विटाळ कालवला, विटाळ कालवला अशी ओरड करणें असमंजसपणाचें नाहीं काय ?






९१