पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिवाशीव.

आहे; व अशा श्राद्धी शूद्राकडे भोजन करण्यास शास्त्रानें कोणत्याहि द्विजास परवानगी देऊन ठेवली आहे. शूद्रेोपि द्विविधो ज्ञेयः श्राद्धी चैवे- -तरस्तथा । श्राद्धी भोज्यस्तयोरुक्तो ह्यभोज्यस्त्वितरो मतः ॥ आपल्या गड्याच्या हातचें अन्न खाण्यासहि शास्त्राची संमतीच आहे. स्वदासो नापितो गोपः कुंभकारः कृषीवलः ॥ ब्राह्मणैरपि भोज्यान्नाः पंचैते शूद्र- योनयः ॥ आपला गडी, न्हावी, गुराखी, कुंभार, शेतकरी यांच्याकडे ते शूद्र असूनहि ब्राह्मणांनीं भोजन करावें असें देवल म्हणतो. घरीं आलेले शूद्राचें अन्न प्रोक्षण करून घ्यावें असें विष्णुपुराणांत सांगितलें आहे: संप्रोक्षयित्वा गृह्णीयात् शूद्रान्नं गृहमागतम्. आपस्तंब धर्मसूत्रांत तर आपआपल्या धर्माप्रमाणें वागणाऱ्या कोणत्याहि वर्णाच्या माणसाचे अन्नो- दक वर्ज्य नाहीं असें विधान आहेः सर्ववर्णानां स्वधर्मे वर्तमानानां - भोक्तव्यम्; मात्र " शूद्रवर्ण्यमित्येके " असें म्हणून शूद्रांकडे भोजन करूं नये असें जें कांहीं लोकांचें मत होतें त्याचा उल्लेख केला आहे. आमच्या स्त्रियांकरतां प्रस्तुत काळाला योग्य अशीं धर्मवचनें संकलित करून धार्मिक विकल्पनांचा लोप करण्याचें पुण्य कोणी संपादन करील काय ?
 समाजाच्या स्थित्यंतरांना अनुरूप असे निरनिराळ्या कालीं निर- निराळे नियम शास्त्रकारांनी घालून दिलेले स्मृतिग्रंथांत संगृहीत केलेले आढळतात. म्हणून ते परस्परविरुद्धहि असतात. विद्यमानकाली आपण कोणते आचार पाळणे इष्ट व हितावह होईल हें त्या त्या • काळच्या शिष्टांनी ठरवावयाचें असतें. ह्यांत पापपुण्याचा प्रश्न नसतो. पण सध्या आमच्या स्त्रीपुरुषांच्या विचारशक्तीवर संक्रांत आल्यामुळे आमच्यांत तारतम्याचा उन्हाळा भासूं लागला आहे. आशौचाचेंच पाहाना? “न वर्धयेदघाहानि प्रत्यूहन्नान्निषु क्रियाः " आशौचाचें ( सुतकाचे ) दिवस वाढवूं नये; कारण त्या योगानें अभिक्रियेचा लोप होतो, असा

८९