पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर त्यांच्या वित्तमंत्र्यांनाही या भूतावरचा मंत्र शोधून काढावाच लागेल. हातचलाखीने हा प्रश्न सुटणारा नाही.
अनेक चेहरे अनेक सोंगे
 अंदाजपत्रकाचे एक विक्राळ तोंड प्रशासकीय किंमतीच्या वाढीच्या रूपाने अंदाजपत्रकाआधीच दिसले होते. अंदाजपत्रकाच्या दिवशी त्याची आणखी दोन तोंडे दिसली. एक अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंगांचे आणि दुसरे नव्याने पुढारी बनलेल्या, नव्या मुल्लाच्या उत्साहाने बांग देणाऱ्या, काँग्रेसचे वित्तमंत्री मनमोहन सिंग यांचे. किंवा एक तोंड आजच्या मनमोहन सिंगांचे आहे. दुसरे तोंड कालच्या. आणखी एक शक्यता अशी – एक तोंड आजच्या मनमोहन सिंगांचे तर दुसरे तोंड काँग्रेस पक्ष नेते पी. व्ही. नरसिंहराव यांचे.

(ग्यानबा न्यूज सर्व्हिस)

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
९५