पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपण गव्हाबद्दल म्हणतो की हिंदुस्थानात तुम्ही गव्हाला २८० रुपये भाव देत असला आणि तुम्हाला परदेशातून तुम्हाला २७९ रुपयांनी जरी गहू आणता येत असेल तर आमची काही हरकत असणार नाही. हिंदुस्थानातल्या ग्राहकाला इथल्यापेक्षा स्वस्तात गहू मिळणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही. ते खुल्या बाजारपेठेच्या तत्त्वातच बसते. पण, फ्रान्समधले शेतकरी असं म्हणायला तयार नाहीत. फ्रान्समध्ये तयार होणारं गोमांस हे साधारणपणे ८४ फ्रॅंक प्रति किलो पडतं; पण इंग्लंडमधून येणारं गोमांस प्रति किलो ६८ फ्रॅंकला म्हणजे १६ फ्रॅंकनी स्वस्त पडतं. म्हणजे इंग्लंडमधून गोमांस आणलं तर फ्रान्समधील नागरिकांना १६ फ्रॅंकने कमी किंमतीत ते मिळू शकेल. फ्रान्सच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्यांचं म्हणणं दुसऱ्या देशातील वस्तू स्वस्तसुद्धा येता कामा नये.
 जगामध्ये डंकेल प्रस्तावावर अशी चर्चा आणि प्रतिक्रिया चालू आहे. या प्रस्तावावर हिंदुस्थानात काही मंडळी खूपच लिहितात, आणि डंकेल हा कुणीतरी मोठा खलपुरुष आहे, त्याने देशाचं अगदी वाटोळं करायचा, देशाला गुलाम करून टाकण्याचा डाव टाकला आहे अशी हाकाटी करताहेत.
डंकेल प्रस्तावातील ठळक विशेष
 आता मी फक्त व्यापाराच्या बाबतीत सांगणार आहे. खुला व्यापार हा काही फक्त वस्तूंच्या संबंधातच विचार करण्याचा मुद्दा नाही. व्यापार हा काही फक्त वस्तूंच्या संबंधातच नसतो. डंकेल प्रस्तावाच्या मसुद्याचे मुख्यतः चार विभाग आहेत. पहिला विभाग, वस्तूंचा व्यापार. दुसरा, सेवांची देवघेव. म्हणजे एखादी बँक उघडणे, कर्ज देणे, तंत्रज्ञानाची देवघेव इत्यादी. तिसरा, भांडवली गुंतवणुकी संबंधी. कारखानदारी, यंत्रसामुग्री, इत्यादी स्वरूपातील भांडवली गुंतवणुकीवरसुद्धा बंधनं असता कामा नये. आणि चौथा भाग, व्यापारसंबंधी बौद्धिक संपदा.
शेतीमालाच्या व्यापारासंबंधी प्रस्ताव
 यातील सध्या आपण, शेतकरी म्हणून, वस्तूंच्या व्यापारासंबंधी पाहू. शेतीमालाच्या व्यापारासंबंधी आणि व्यवस्थेसंबंधी डंकेल मसुद्यात जे काही प्रस्ताव आहेत, ते असे.

 पहिला एक प्रस्ताव आहे की शेतकऱ्यांवर लेव्ही किंवा अशा

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
६९