पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. पण हे सगळे काम गर्भाच्या वाढीसारखे आहे. त्यात घिसाडघाईला जागा नाही. कोणी गर्भकाल आखूड करायचा प्रयत्न करू लागला तर त्यात फक्त गर्भाचा जीवच धोक्यात येतो. बळिराज्यातली सर्व व्यवस्था निसर्गनियमाने आणि सहजपणे बहरून आली पाहिजे. पहिल्या पावसानंतर सगळे आसमंत हिरवेगार दिसू लागते तसाच हा चमत्कार घडून येऊ शकतो. स्वार्थापोटी काही भानगडी मंडळींनी काही ढवळाढवळ केली नाही तर हे होणार आहे. हा चमत्कार 'याची देही, याची डोळा' पाहाण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे - आपण ठरवले तर.

(२१ ऑक्टोबर १९९१)

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२३