पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वांसमोर ठेवला.
 गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात १५०० हून अधिक कापूसउत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका लहानशा अळीने - बोंडअळीने त्यांना आत्महत्या करायला लावली. बोंडअळीचा इतका प्रचंड हल्ला झाला की कापसाचे पीक नाहीसे झाले आणि त्यांना आत्महत्या करणे भाग पडले. आता कापसाचे एक नवीन बियाणे असे निघाले आहे की त्या बियाण्यातून उगवलेल्या रोपांवर बोंडअळी येतच नाही. कपाशीच्या बियाण्याच्या विशिष्ट जनुकात काही बदल करून शास्त्रज्ञांनी हे बोंडअळीला प्रतिबंध करण्याची अंगची ताकद असलेले बियाणे तयार केले आहे. आज हे बियाणे अमेरिकेतील ३५ टक्के शेतकरी वापरतात. त्याचा परिणाम असा झाला की तेथील कापसाचे उत्पादन वाढले आणि औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे उत्पादनखर्चही कमी झाला. आणि त्यामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झाली आहे की कापसाचा जागतिक बाजारपेठेतला भाव हिंदुस्थानातील कापसाच्या भावापेक्षा कमी आहे. हे घडले कारण अमेरिकेत शेतकऱ्यांनी हरित क्रांतीच्या पुढे पाऊल टाकून जनुक क्रांतीत भाग घेतला आहे.
 आमच्याकडे काय चालू आहे? कर्नाटकातील शेतकऱ्यांना कापसाच्या या बियाण्याचे चाचणी प्रयोग करण्यासाठी त्याच्या उत्पादकांनी बियाणे दिले होते. तर कर्नाटकातले शेतकरी नेते डॉ. नंजुडस्वामी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या शेतकऱ्यांच्या प्रयोग शेतांत जाऊन ती झाडे सगळी उपटून टाकली. गेल्या नोव्हेंबरमध्ये सिएटलमध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेच्या वेळी ही सर्व मंडळी जमली होती आणि त्यांनी अशा तऱ्हेच्या तंत्रज्ञानाला विरोध करणारी निदर्शने केली.

 महाराष्ट-ामध्ये पाचशे शेतकऱ्यांनी अर्ज करून या बियाण्याची चाचणी घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “आम्ही, हे तंत्रज्ञान चांगले आहे असे म्हणत नाही, वाईट आहे असेही म्हणत नाही. पण, नवीन काहीतरी तंत्रज्ञान आहे त्याचा प्रयोग करण्याचा अधिकार आम्हाला आहे. प्रयोग करून आम्ही ठरवू की हे तंत्रज्ञान स्वीकारायचे का नाही ते. ते चांगले आहे का वाईट आहे, फायद्याचे आहे का तोट्याचे आहे, अधिक उत्पादक आहे का कमी, अधिक

१३६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने