पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकशाही राष्ट- म्हणून प्रतिमा आणि प्रतिष्ठा होती. इस्लामिक देशसुद्धा या प्रतिमेमुळे काही मर्यादेपलीकडे हिंदुस्थानविरोधी भूमिका घेण्यास धजत नसत. गौतमबुद्ध, महात्मा गांधींपासूनच्या या परंपरेची दोन दिवसातील पाच स्फोटांनी वासलात लावून टाकली आहे.

 साऱ्या इस्लामिक देशांचाच आता पाकिस्तानवर दबाव वाढणार आहे. इस्लामी देशांच्या हाती अणुशक्ती असावी असा अनेक वर्षे तेथील जहाल हुकुमशहांचा प्रयत्न चालू आहे. अशी शस्त्रे हाती आली तर बिनदिक्कतपणे इस्रायलविरुद्ध त्यांचा उपयोग करण्यास ते कचरणार नाहीत. इस्लामी अणुबाँब हरप्रयत्नाने तयार होऊ न देणे हे पाश्चिमात्य राष्ट-ांच्या परराष्टीय धोरणाचे मोठे सूत्र आहे. मध्यपूर्वेतील, त्यातले त्यात आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेली मुस्लिम राष्ट्रे केवळ अमेरिकेच्या दबावामुळे अणुस्फोट करण्यास धजावत नाहीत. पण, गद्दाफी आणि सद्दाम हे काही फक्त दोनच माथेफिरू नेते नाहीत. 'हिंदुस्थानपासून संरक्षण करण्यासाठी बाँब तयार करणे हा आमच्या राष्टीय अस्मितेचा आणि सुरक्षेचा प्रश्न आहे' असा कांगावा करून पाकिस्तानने अणुसामर्थ्य मिळविले तर ते थोड्याच काळात साऱ्या अरब लष्करांना उपलब्ध होईल यात काही शंका नाही. पाकिस्तानी बाँब तयार होऊ नये यात पाश्चिमात्य देशांना प्रचंड स्वारस्य आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानी चाचण्यांना उत्तर म्हणून अणुस्फोट करू नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पाश्चिमात्य राष्ट्रे करतील. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला चेपण्यासाठी, पाकिस्तानने खरेदी केलेली एफ-१६ विमाने देखील अमेरिकेने कित्येक वर्षे अडवून ठेवली, एवढेच नव्हे तर खरेदीची रक्कमही गोठवून टाकली. हिंदुस्थानी अणुचाचण्यांनंतर आता ही विमाने पाकिस्तानला देण्याचे अमेरिकेने ठरविले आहे. हिंदुस्थानच्या हुंब भूमिकेचा फायदा घेऊन पाकिस्तान पारंपरिक शस्त्रास्त्रसजतेत भरगच्च मजबुती आणेल असे दिसते आहे. प्रत्युत्तर म्हणून अणुस्फोट करण्यापेक्षा अणुस्फोट करण्याची भाषा बोलत राहणे आणि त्या धमकीपोटी आधुनिकतम शस्त्रास्त्रे मिळवीत राहणे हा खेळ पाकिस्तानला मोठा फायद्याचा ठरणारा आहे. पाकिस्तानी पुढाऱ्यांचेही डोके फिरले आणि त्यांनी स्फोट केला की शस्त्रसामुग्रीच्या मदतीची ही गंगा आटून जाईल. येत्या काही काळात तरी सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापण्याचा अजागळपणा पाकिस्तान करणार नाही. कारण उघड आहे. खरोखर युद्धाचा प्रसंग उद्भवला तर अण्वस्त्रांचा तसा

११६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने