पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काही ज्ञानकण जोडून दिल्याने होणार नाही का?
 गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताची दुर्दशा आपण पाहिली. एरवीही भारतीय पुरुषांचे उच्चांक जागतिक महिलांच्या उच्चांकाच्या खालचे असतात. आपण कबड्डी, खो-खो, फुटबॉल, टेनिस यांतील गल्लीपातळीवरील प्राविण्याचा 'ततः किम्' म्हणून उपहास करण्यापेक्षा हे प्राविण्य अभ्यासाने कसोशीने, तपस्येने, आंतरराष्ट-ीय पातळीवर उच्चांक फडकवणारे व्हावे असे जोपासले तर ती राष्ट ट-सेवा होणार नाही काय?
 विद्या, कला, क्रीडा, नेतृत्व, वक्तृत्व या सगळ्याच क्षेत्रात परिस्थिती अशी की आमची राष्ट-ीय शिखरे जगाच्या तुलनेत खुजी वारूळे दिसू लागावी. मागासलेल्या देशात सारीच चणचण असली तरी महात्म्यांची वाण नसते. जन जितके अध:पतित् तितके त्यांचा उद्धार करण्याचा डौल मिरवणारे 'थोर' लोक अधिक संख्येने उपलब्ध, त्यांचा मानही मोठा. सारा देश दैन्यावस्थेतला. पण दैवी गुणांच्या महात्म्यांचा उदे उदे प्रचंड! मग कुवतीची तरुण मुले आईन्स्टाईन होऊ पहात नाहीत. एफेल होण्याची धडपड करत नाहीत, वनगॉग होऊ पहात नाहीत, बिल गेटस्, पिट सॅम्प्रस होण्याचे स्वप्न बाळगत नाही, उलट असल्या सगळ्या कर्तबगारीचा 'ततः किम्' म्हणून उपहास करतात. आणि काही शाब्दिक वाचाळपणा करण्याच्या कामाला राष्ट-सेवा म्हणतात. आपणही तसंच करणार काय? कुंपणापर्यंत कशीबशी पोच असलेले, कुंपण ओलांडण्याऐवजी राष्ट-सेवेची पोकळ बतावणी सुरू करतात काय?

 शब्दांच्या, भाषेच्या थाटावरून आपण ज्ञानप्रबोधिनीच्या पठडीतले आहात हे उघड आहे. वेदान्तात पिंड व ब्रह्म यांचे अद्वैत मानले आहे. पिंडाचा दृष्टिकोण आणि ब्रह्मज्ञान यांत काही तफावत नाही. 'पिंड आपल्या प्रेरणेने पुढे जात जातच ब्रह्मांडाचा हेतू सफल करतो.' असा विचार आहे. वेदान्त व्यक्तिवादी आहे, हिंदु तत्त्वज्ञानाची ती सर्वोच्च परंपरा आहे. मुसलमान आणि युरोपीय आक्रमणापुढे हतबल झालेल्या समाजाने घाबरून व्यक्ती आणि विश्व यांचे अद्वैत संबंध जोडणारी ही विचारधारा सोडली आणि जेत्यांच्या कल्पनांतील सामूहिक पूजा, प्रार्थना, राष्ट-चे श्रेष्ठत्व, व्यक्तीचे दुय्यमत्व अशा कल्पना स्वीकारल्या आणि पराभवामुळे खचलेल्या समाजाची विवेकानंद, हेडगेवार आणि बाळ ठाकरे अशी दैवते बनली. व्यक्ती हे

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२२३