पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुभवाचे, विचाराचे, चिंतनाचे एकक आहे. आपल्या शोधाच्या प्रवाहात स्वतःच्या सोयीसाठी तो कुटुंब, वाडी, टोळी, गाव, जात, धर्म, राष्ट- अशा वाढत्या व्यापकतेच्या समूहांचा घटक बनण्याचे स्वीकारतो. समूहाचे सदस्यत्व काही बंधने घालते. पण स्वातंत्र्याच्या अनेक कक्षा मोकळ्या करून देते. राष्ट- ही व्यक्तींची एका विशिष्ट कालखंडातील गरज असते. युद्धप्रसंगी व्यक्तीने राष्ट-करिता स्वत:चा बळी देण्याची तयारी दाखवावी हे समजण्यासारखे आहे. अन्यथा व्यक्तींकरिता राष्ट- हेच योग्य.
 व्यक्तिमत्वाच्या परिपोषातून राष्ट-चे कल्याण साधत नसेल तर राष्ट- ही काही मायावी राक्षसी गोष्ट आहे, असे मानावे लागेल. आपण विविध क्षेत्रात निपुण आहात. त्यातील कोणतेही एक क्षेत्र निवडा. आम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशी काही कामगिरी करून दाखवा. राष्ट-सेवा अशा व्याख्याशून्य निरर्थक कल्पनांच्या हव्यासात आपली भाग्याची उतरंड विफल करू नका एवढीच विनंती. मनांत आले ते लिहिले, पत्रोत्तराची अपेक्षा तर नाही. कधीतरी भेट होऊ शकली तर आम्हाला आनंद वाटेल.

आपला,

शरद जोशी


(२१ फेब्रुवारी १९९७)

२२४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने