पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी कामगिरी बजावल्याचेही काही माहिती नाही. कुल, रूप, बुद्धी यांच्याबद्दलची ही स्वकौतुकी आहे का वास्तविकता आहे?
 परीक्षेत गुण मिळवले आणि सध्याच्या समाजाच्या मापदंडाने वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी प्रवेश मिळवला म्हणजे आपण सारे गड जिंकलो, आता आपल्या स्वत:च्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे तरी किती याची चिंता पडलेला एक अविनाश धर्माधिकारी मी पाहिलेला आहे. तुमची गत त्याच्यासारखी तर नाही!
 खेळ, कला, वक्तृत्व, लेखन, विदेश-यात्रा, मोठा पगार, पुढारीपण या सगळ्यात काही नाव कमावले याबद्दल आपण खरंच अभिनंदनास पात्र आहात. आणि यानंतर ततः किम्? या गोष्टीचे काय कौतुक आहे. यापलीकडे राष्ट-सेवा घडली पाहिजे अशी आपली दुर्दम्य आकांक्षा आहे याचे तर विशेष नवल वाटले!
 आता राष्ट-सेवा म्हणजे आपण काय करू इच्छिता हे मात्र काही लक्षात येईना. या देशातील कोट्यानुकोटी लोक दैन्यात आहेत ते दैन्य दूर करण्यासाठी काही पौरुषाची प्रतिज्ञा आपण करू इच्छिता? हे नेमके पौरुष कोणते? त्याचे रूप काय? त्याचा मार्ग काय? हे जर स्पष्ट नसले तर पौरुषाची ही पूजा निर्माल्य होऊन कोणत्यातरी जातीयवादी गटारगंगेस मिळण्याचा मोठा धोका असतो.
 अभ्यास, खेळ, कला, लेखन, द्रव्यार्जन ही सारी क्षेत्रे वेगळी. यात कितीही नैपुण्य मिळवले, प्राविण्य मिळवले, कीर्ती मिळवली तर 'ततः किम्?' या क्षेत्राच्या बाहेर राष्ट-सेवेचे असे काही वेगळे क्षेत्र आहे, आणि त्यात पौरुष गाजवायचे आहे, ते हे पौरुषाचे क्षेत्र कोणते?

 तुमच्या कुशाग्र बुद्धीचा तुम्ही जागतिक कीर्तिमानपात्र वापर केला (म्हणजे परीक्षेत प्रश्नांची सोडत घेऊन उच्चांक मिळवण्याकरिता नव्हे) तर ती राष्ट-सेवा आहे का नाही? जगभरात आज संशोधनाचा रथ प्रचंड वेगाने चालला आहे. इलेक्ट-ॉनिक्स, जेनेटिक्स या क्षेत्रांत तर अद्भूत अवतरत आहे. या सगळ्या संशोधनात कोणी भारतीय सामील झाला तेव्हा काही घडले. जयंत नारळीकर पुण्यास परतले आणि निष्प्रभ झाले. ही जी तुम्ही राष्ट-सेवा राष्ट-सेवा म्हणतात ती विज्ञान, वैद्यकीय, यांत्रिकी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र

२२२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने