परिशिष्ट-१
स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक १
स्वतंत्रतेचा वेदान्त
स्वतंत्रता म्हणजे काय? सर्व बेड्यासाखळ्या तुटल्या; सर्व गुलामगिरी
संपली; स्वातंत्र्याची यात्रा सुरू झाली म्हणजे काय होते नेमके ? रवींद्रनाथ
टागोरांनी त्यांच्या एका कवितेत वर्णन केले आहे.
..... मने निर्भय असतील;
..... आणि माना ताठ;
..... जगाचे कप्पे कप्पे पाडणाऱ्या
क्षुद्र भिंती कोसळलेल्या असतील;
..... शब्द सांगतील फक्त सत्यच;
..... अथक प्रयत्न पराकाष्ठा करतील
परिपूर्णतेला स्पर्श करण्यासाठी;
..... विचारांचा शुद्ध प्रवाह
सवयीच्या वाळवंटात जिरणार नाही;
..... मने झेपावतील
सतत रुंदावणाऱ्या
विचार आणि कार्य
यांच्या क्षितिजाकडे
मन, ज्ञान, सत्य, परिपूर्णता, विचार अशा चैतन्यमयी अ-जड शब्दात मांडलेली ही स्वतंत्रतेची गुरुदेवप्रणीत व्याख्या; त्यातील शब्दांच्या जादूनेच भारावून टाकणारी. पण रोजच्या व्यवहारात कोणती स्पष्ट जड व्यवस्था पाहिजे? तुरुंगांच्या भिंती आणि गजाआड थोर व्यक्ती आपले व्यक्तिमत्व जपू शकल्या. पारतंत्र्यातही समाज स्वातंत्र्याची स्वप्ने जपू शकतो. पण हे सारे अपवादादाखल. जड बंधने जशी संपतील तसतसे स्वातंत्र्याची क्षितिजे रुंदावू लागतात हा मुख्य नियम. “जगाचे कप्पे कप्पे करणाऱ्या क्षुद्र भिंती कोसळलेल्या असतील.” म्हणजे विचार, सेवा आणि वस्तू यांची देवघेव निर्बंधपणे होणे ही स्वतंत्रतेची महत्त्वाची अट आहे. माणसामाणसातील