पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर्कप्रणाली आहे. जगभर खुली व्यवस्था नसेल तर देशाच्या आत खुली व्यवस्था अंमलात आणणे आणि टिकविणे केवळ अशक्य होईल.
 थोडक्यात, नव्या काळाचे सूत्र असे आहे. साऱ्या भिंती पडू देत, जगभर मोकळे वारे वाहू दे, त्यातच सर्वभूतांचे कल्याण आहे. खिडक्या उघड्या राहू देत, काही वारा बाहेरून आत येईल, काही वारा आतून बाहेर जाईल. एकाच दिशेने वारा वाहू देणारी खिडकी अशक्य आहे.
 नुसतीच आयात झाली तरी ती जागतिकीकरणाची एक लाट आहे म्हणून शेवटी, कल्याणप्रदच आहे एवढी निष्ठा निदान वित्तमंत्र्यांकडून तरी इ. स. २००० मध्ये अपेक्षित करणे चूक नसावे.

(दैनिक लोकमत ४-११-२००० साठी लिहिलेला लेख)

१७०
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने