Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. तेवढी मांडणे पुरेसे आहे.
 पहिले सूत्र असे : एका एककामागे किती फायदा होतो याला फारसे महत्त्व नाही, उलाढाल मोठी असली आणि एककी फायदा किरकोळ असला तरी शेवटी होणारा एकूण फायदा मोठा असू शकतो. एका साबणाच्या वडीची किंमत ठरवताना वडीमागे फायदा जास्तीत जास्त किती ठेवाल? चार आणे किंवा आठ आणे. किंमत एवढीशी वाढवल्यामुळे सारे ग्राहकच दुसऱ्या साबणांकडे वळले आणि विक्री काही झालीच नाही तर मग काय फायदा? याउलट, फायदा अगदी किरकोळ ठेवला आणि त्यामुळे हजार वड्या खपू लागल्या तर उत्पादकाची आणि विक्रेत्याची मिळकत वाढते. 'उलाढाल वाढवा, फायदा कमवा! नफेखोरीने नाही.' हे पहिले सूत्र.
 दुसरे महत्त्वाचे सूत्र : मागणी तसा पुरवठा. हे शेतीच्या उदाहरणाने सांगता येईल. ग्राहकाला कोणता माल पसंत आहे, कोणत्या वाणाचा, कोणत्या गंधाचा, कोणत्या चवीचा. हे सुपरमार्केटमधील दररोजच्या कीर्दखतावण्यांकडे पाहिले तरी लक्षात येते. तिथले व्यवस्थापक शेतकऱ्यांना वाण पुरवतात, साधने पुरवतात, प्रशिक्षणही देतात आणि शेतकऱ्यांच्या मालाच्या पुरवठ्यासंबंधी करार करतात. जितका येईल तितका माल घेतला जातो. सुपर मार्केटचे जाळे हजारो दुकानांचे, देशभर विखुरलेले असल्यामुळे माल विकत घेण्याची त्यांची ताकद अफाट असते.

 कारखानदारीच्या क्षेत्रात सुपर मार्केटची व्यवस्था एक पाऊल आणखी पुढे टाकते. कारखानदारांनी तयार केलेला माल केवळ कमिशनपोटी विक्रीला ठेवणे या व्यवस्थेला परवडत नाही. त्यांच्याकडे स्वतंत्र संशोधन-शाळा असतात. समजा, एका कंपनीचा पंखा बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. कार्यशाळेत त्या पंख्यातील यंत्रणेचा तज्ञांकडून खास बारकाईने अभ्यास केला जातो. पंख्याच्या बांधणीत काही आलतू फालतू मालाचा वापर केला असेल तर तो काढून टाकला जातो. काही महागडे सुटे भाग वापरलेले असले तर त्यांच्या जागी स्वस्त सुटे भाग कसे वापरले जातील याचाही बारकाईने अभ्यास होतो. अनुभव असा की कोणत्याही गृहोपयोगी वस्तूचा उत्पादनखर्च २०% ते ३०% नी कमी करता येतो. मग, व्यवस्थापक कारखानदारांशी बोलणी चालू करतात. आम्हाला तुमचे पंखे विकत घ्यायचे आहेत, पण डिझाईनमध्ये आम्ही सांगतो

१५२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने