करतात. साठवणूक वाहतूक यांची व्यवस्था हाती ठेवतात आणि जगातील
जास्तीत जास्त चांगल्या किंमती आपल्या सदस्यांच्या पदरी पडाव्यात
यासाठी ते राष्ट्रीय शासन, सांसद यांच्यावर दडपण आणतात आणि क्वचित
प्रसंगी परदेशातील सरकारांनाही वश करून घेतात. या सगळ्या
कामगिरीबद्दल उत्पादकांचे संघ एकूण विक्रीच्या रकमेच्या ठराविक टक्केवारीने
फीही वसूल करतात. अलीकडे मी अमेरिकेतील सोयाबीन आणि भुईमूग
यांच्या उत्पादकांच्या संघांना भेट दिली. त्यांची साधनसंपन्नता आणि
कार्यक्षमता पाहून मलातरी आपण कोणा अद्भुताच्या देशात आलो आहे
असे वाटले.
बाजारपेठ म्हटली की ती पुरवठा करणाऱ्यांची आणि मागणी
करणाऱ्याची एकत्र येण्याची जागा. उत्पादकांचे संघ उत्पादकांच्या हिताचे
संरक्षण करतात. पण ग्राहकांच्या हिताचे काय? ग्राहकांच्या हितांचे संरक्षण
करणारी दुसरी यंत्रणा उभी राहिली तर 'ग्राहक विरुद्ध उत्पादक' असा संघर्षही
झडण्याची शक्यता तयार होईल. या कारणाने उत्पादकांच्या संघांसारखेच
ग्राहकांचेही संघ असतात. आणि त्याखेरीज, उत्पादक आणि ग्राहक यांच्यात
दुवा साधणारी एक अद्भुत व्यवस्था सर्व प्रगत देशात आढळून येते. या अजब
व्यवस्थेचे नाव 'सुपर मार्केट्स्.'
आपल्याकडेही अलीकडे 'सुपर मार्केट्स' अशी पाटी लावलेली
दुकाने अनेक आढळतात. कोपऱ्यावरच्या किराणा मालाच्या दुकानाचीच
थोडी वाढवलेली आवृत्ती, कौंटरजवळ काही खाद्यपदार्थ आणि जवळपास
थोडीफार फळफळावळ, भाजीपाला एवढाच काय तो फरक. नेहमीच्या
दुकानांप्रमाणेच ग्राहकाने मागणी केली म्हणजे या सुपर मार्केटचा दुकानदारही
मोठ्या डब्यातून किंवा पोत्यातून माल काढून गिऱ्हाईकाच्या मागणीप्रमाणे
वजनमाप करून पुडके बांधतो, दोरा गुंडाळतो.
खरोखरीच्या 'सुपर मार्केट मध्ये ग्राहक दुकानभर फिरतात, दुकानातील वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे पदार्थ, किराणा, भुसार, भाजीपाला, फळफळावळ, प्रसाधने, मसाल्याचे पदार्थ, तयार खाद्यपदार्थ इ. वजनमाप करून किंमतीचे लेबल लावून मांडून ठेवलेले असतात. गिऱ्हाईक आपापल्या गरजेप्रमाणे वस्तू घेऊन टोपलीत किंवा हातगाडीत जमा करत जातो. वस्तूंची