Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माधवनिधन काव्य.

परवनिता मानावी, वमनोसम,
जाण शास्त्र वदतें हैं ! ॥ ६ ॥
नगरस्थ युवतिकेन्या,
तवत्ते जनकैशी सदा राहो ||
अर्पुनि कोण वदे तो, ?
तनुजा की सुकुलज सदारा - हो ॥ ७ ॥
निशिदिनि त्या कळकळती,
त्याभगिनि कन्यकाही स्वदारा - हो ॥
सुखनिद्वाती घेई,
कोण असा ? करूनि मुक्त स्वदारा हो ॥८॥
झाले गेली गंगा,
परि आतां तीर्थ शेषं पदरीं घे ॥
होई दोष विभुक्ति,
जरि झाला तो पश्यति सुरपेद-रिघे ॥ ९ ॥
परिसोन सदुक्ति ते,
नच झाला शांत अधिकची खवळे॥


 १ ओके प्रमाणे. २ नगरस्थ स्त्रिया ह्यांस तूं कन्येप्रमाण मान ( ह्मणजे त्यावर पापदृष्टि घालू नकोस असा भाव ) ३ तुझी व- र्तणूक. ४ बाबासारखी. ५ कन्या. ६ उत्तम कुलांत ज्याचा जन्म झाला आहे असा ७ कन्येस स्त्री प्रमाणे मानील किंवा मानण्या- स तयार होईल. ८ आमच्या स्त्रिया (जे जन माधवरा- वाशी माषण करीत होते त्यांच्या. ) ९ घराचा दरवाजा (घ- राचा दरवाजा उघडा ठेवून सुखं मी निद्रा घेईन असे कोण म्हणेल.) १० अवशेष ( बाकी ). ११ मुक्तता ( मोकळेपणा ). १२ पश्चा० ताप १३ सुरपद = ( देवलाकाप्रत ).