Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माधवनिधन काव्य.

वरकुल माधवराया,
तववर्ती त्रस्त भाग नगरीचा ॥
यास्तव सोडी मुळिची,
कुमति जी भाग नाशि गोडीचा ॥ ५ ॥
तव पूर्वज ते कसे ? !
काय असे तूं अनर्थ करिशी हे ॥


( मागील पृष्ठावरून पुढे चालू. )

त्यांस माधवराव ह्या नांवाचा एकच मुलगा झाला होता. तो ल- हानपणापासून स्वभावतः चाणाक्ष असा होता व बापानें तो एकु - लता एक असा असताही त्याचे फाजिल लाड न करितां त्यास सुशिक्षण देऊन आपले पश्चात् हा आपणाप्रमाणेंच खचित सुकीर्ति •मिळवील असा झाल्यावर आपले काम पाहण्यास दिलें होतें. मध्यंतरी विसाजीपंताचें कुटुंब ( सावित्रीबाई ) ह्या अकाली मरण पावल्या होत्या व त्यायोगें विसाजीपंताचें अंतःकरण संसारसुखा पासून विरक्त होऊन ते काशिक्षेत्राप्रत निघून गेले होते. माधवरा- वांच्या हाती कोतवालगिरीचे काम असतां बरेच दिवसपर्यंत तें न्यायनीतीनें केलें होतें; परंतु सुमारें (विसाजीपंतांस काशीक्षेत्रास जाऊन १० दहावर्षे होण्याचे बेतास ) एक तप होतें न होतें तों त्यांचे सुवर्तनांत फरक पडतां पडतां फारच पडून तो दुरावर्तनप्रि- य असा झाला. ह्याचें कारण असें सांगतात कीं, त्या गांवांत त्या- वेळी बापूराव ह्या नांवाचा एक कुमति ब्राह्मण रहात असून तो दरिद्री सवत्र माधवरावाचें आश्रयासच नेहमीं असे व त्याचेच उप- देशाने माधवरावांचे वर्तनांत फरक झाला होता; आणि शेवटीं ते दोघेही त्या कृत्याचे पायींच मारले गेले होते !! हैं दु:संगतीचें फळ. ! !

१ श्रेष्ठ कूळ. १ तुझ्या वागण्यानें. 3 वाईट बुद्धि.