Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

११

विसर पाडणारी कलाच नाहीं असें ह्यटलें तरी चालेल ! ! ह्या कलेनें सर्व कांहीं साधतें ? प्रत्यक्ष आपल्या शत्रूसही मित्र करितां येतो !! फार तर काय ? ह्या कलेच्या माधुर्यानें वृक्ष पाषाणही द्रव- तात ! ! अस्तु. वाचकहो तुम्हास देखील या गोष्टीचा पूर्ण अनुभव आहेच ह्मणून आमचे हे लिहिणें अग- दींच बडेजावीचें आहे असें वाटणार नाहीं !! राजपुत्र मदनविलास त्यास ही कला फार लोकोत्तर अशी साधली असल्यामुळे आणि त्याचा कंठ इतका कांहीं मधुर असे कीं तो ज्या वेळीं खप्या खऱ्या आनंदांत येऊन गायन करी त्यावेळीं त्याचें तें मधुर गाणे श्रवण करून नेहमींच्या परिचितांस देखील हा कोणी स्वर्गीचा देव अथवा गंधर्वच गायन करीत आहे कीं काय? अशी भूल पडे ! ! ! त्याला ह्या गायनाच्या छंदांत असतां वेळेवर खाण्यापिणाचाहि विसर प डावा इतकी कांहीं ती कला त्यास जीवश्च कंठश्च वाटत असे! आणि त्या विद्येचा जाणता कोणी त्याकडे आला कीं तो त्याची फार चहा करी, यास्तव दूरदूरच्या देशाचे गायनवादनपटु अनेक लोक त्याची कीर्ति श्रवण करून आश्रय मिळण्याच्या इराद्याने त्याच्या भेटीस येऊं जाऊं लागले होते? व कित्येकांस तर त्यांनी स्वतःच्या पैशांतून वेतन ठरवून देऊन पदरीं राखूनही ध्यावें. !
 मांगें सांगितल्याप्रमाणे तो राजपुत्र मदनविलास स- र्वसंमतीनं त्या विश्रांतमंदिरीं मित्रासहवर्तमान स्वातंत्र्य- सौख्याचा अनुभव घ्यावयास राहिला असतां त्यानें