Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
विश्रांतिमंदीर.

भद्रसेन प्रधान व विजयशेट ह्यांनींही आपल्या योग्य- तेनुरूप त्या गुरूस द्रव्यादिक देऊन संतुष्ट केलें. व त्या त्रिवर्गांनी फार उत्तम विद्या संपादन केली ह्मणून सर्वांस मोठा आनंद झाला. आणि शेवटीं त्या गुरुवर्यांनी त्या त्रिवर्गीस यापुढे कसें वागावें या- विषयी उत्तम प्रकारें सुबोध व राजादिकांनी स्वतःची केलेली मानप्रतिष्ठा योग्य झाली अशाविषयीं आभार प्रदर्शक भाषण केल्यावर पानसुपारी वगैरे आटोपून त्या त्रिवर्गाचा जयजयकार करीत दरबार बरखास्त झाला. आणि त्या त्रिवर्गीस त्याच्या सुशीलपणाबद्दल व त्यांनी मागून घेतल्यावरून दोन वर्षे पावेतों स्वतंत्र- पणें विश्रांतिस्तव नगरबाह्यप्रदेश असलेल्या विलास- चननामक उद्यानांतील रमणीय 'विश्रांतमंदिरीं' वास करण्याची परवानगी मिळाली.
 वर सांगितल्याप्रमाणं मदनविलास नामक राज- पुत्र संपूर्ण विद्या शिकून पारंगत तर झालाच होता, परंतु त्या सर्व विद्यत त्याची एक विद्या फार वाखा- णण्या सारखी अति उत्तम अशी साधली होती ह्मणून त्या विद्येच्या संबंधानें त्याची तारीफ केल्यावांचून आमच्याने राहवत नाहीं करितां त्याबद्दल दोन शब्द आह्मी या स्थळीं प्रथम आणि मुद्दाम लिहितों.
 ह्या जगांत मनुष्य प्राण्यास आनंदांत काळ घाल- विण्याकरितां पुष्कळ तऱ्हेच्या कला ईश्वरानें उत्पन्न केल्या आहेत, पण त्या सर्वांत गायना सारखी प्रिय व मनुष्याचें अंतःकरण खरें खरें गार करून सोडून क्षणभर संसार प्रपच्यसंबंधि नानाविध यातनेचा