Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
विश्रातिमंदीर.

आपणास हल्लीं स्वतंत्रता आहे व ह्या स्वातंत्र्यांत आ- पलें मन फाजील कृत्याकडे अवश्य जाईलच, तें न जावें, आणि मन लागेल त्यावेळींच एखादे कृत्य करावयार्चे अशी संवय स्वातंत्र्यस्थितीत त्यांस एकदां जर कां लागली, तर तो पुढे आपण राजपदारूढ झालों, तरी मोडणें कठिण. ! आणि राजपदारूढ झालेल्या पुरुषानें स्वछंदीपणाने वागणें हें फारच वाईट आहे, यास्तव आपला नित्यचा काळ नियमित कृत्या - कडे विभागिला पाहिजे असें ठरवून त्याने सूर्योदया- पासून पुन्हां दुसऱ्या दिवशींचा सूर्योदय होई पावेतों ग्रथित केलेल्या चोवीस कलाकांचे १६ सोळा विभाग क- रून त्या त्या विभागीं तें तें कृत्य करावयाचें असा क्रम ठेविला. खाली लिहिल्याप्रमाणे त्यांनी आपला नित्यचा काळ दरएक कृत्याकडे योजिला असे. (१) अरु- णोदयाचे सुमारास निजून उठून नित्य कर्मे आटोपणें ( २ ) सूर्योदय होत नाहीं तोंच मित्रासह तालीम- स्वान्यांत प्रवेश करून दिवसेंदिवस चढत्या प्रकारें स्वशक्तिमानानें कसरत करणें ( ३ ) सूर्योदयाचे सुमारास मृगयेस निघून जाणें ( ४ ) प्रहर दिवस ये- तांच परत घरी येऊन स्नान पूजादिकांत २ दोन घ- टिक। घालविणें. ( १ ) भोजनोत्तर तांबूल भक्षण वा- मकुक्षी करण्याकडे २ दोन घटिका ( ६ ) बारावी घटिका लोटतांच निजून उठून एखाद्या विषयावर स्वचुद्धि- च्या कोटी लढविण्यांत, नवीन शास्त्रादिकांचा अभ्यास करण्यास आरंभ करणें ( ७ ) विसावी घडी लोटतांच आपल्या गुरुवर्ग समतेच्या शिष्टांबरोबर एखाद्या