Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

फार चांगला शोभतो असे सर्वसंमत मिळाल्यामुळे इंदुशेखरास पुत्राचा विवाह करून घेण्यास तत्पर ब- नविलें होतें व त्याकरितां त्यानें अगणित द्रव्य खर्च करून सर्व जनमन संतुष्ट करीत होत्साता आपले पुत्राचा विवाह करून घेतला होता.
 बहुतेक असा प्रकार आढळण्यांत येतो की मु- लाचे लग्न झालें, ह्मणजे तो विद्याभ्यासाविषयीं परा- ङ्मुखच व्हावयाचा, परंतु ह्याच्या उलट प्रकार मद- नविलासाचा विवाह झाल्यावर आईबापांच्या व इतर प्रेक्षकांच्या नजरेस येऊ लागला होता. तो असा कीं त्यानें आपले लग्न झाल्यावर पुढे आपला बहुतेक अ- म्यास सुमारे दोन सवादोन वर्षांतच अगदी आटोपून टाकिला होता. व तो आपल्या वयाच्या १८ अठरा- व्या वर्षी लेखन, वाचन, गणीत, भूमिति, व्याकरण, भूगोल, खगोल, नकाशे, अनेक देशांचे इतिहास, प- दार्थविज्ञानशास्त्र, छंदशास्त्र, न्यायशास्त्र, अलंकारशास्त्र, संगीत मीमांसाशास्त्र, राजनीति, व्यवहारनीति, आणि श्रेष्ठ जनमान्य गीर्वाण भाषा इत्यादि विद्या शिकून निष्णात झाला होता आणि आतां ह्याचा पुढें कांहीं एक अभ्यास राहिला नाहीं असें गुरुमुखानें श्रवण केल्यावर एके दिवशी राजाने मोठा दरबार भ- रवून आपल्या पदरच्या पंडितांच्या देखरेखीखाली त्या त्रिवर्गाची अगदी कसोटी लावून पाहून परीक्षा घेतली, तो तें खरंच! ह्मणून मोठा आनंद पावून त्या गुरुवर्या अगणित द्रव्य व अमोलीक पदार्थ अ- पर्ण करून त्याची मानप्रतिष्ठा केली. त्याच प्रमाणें