Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

च्छितच नाहीं असें एकच उत्तर सर्वांस मिळत गेल्या- मुळे ते निराश होऊन परत जात. ! राजाचा असा जवाब देण्याचा हेतु द्विरर्थी होता. १ एक आपला पुत्र विवाह केल्यावर विद्येकडे दुर्लक्ष करीत आणि दुसरे हा जसा गुणी आहे तशीच ह्याच्या साम्यतेची वधू मिळाली पाहिजे आणि तशी मिळणें हें काम जरा स्थैर्याचें आहे. ! ! ह्याप्रमाणे कित्येक राजे मद- नविलासास आपली कन्या देऊन जामात करण्यावि- षयीं चाहत होते. परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं आणि शेवटीं एक अकल्पित योग येऊन इंदु- शेखराचा पूर्ण निश्चय असतांही तो मोडून मदनावे- लासाचें त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झालें. ( मात्र त्या गोष्टींत इंदुशेखराचा एक हेतु तडीस गे- ल्यासारखें होतें) त्याचा प्रकार असा:-
 मांगें सांगितल्याप्रमाणे मदनविलासाची कीर्ति देशांतरावर जाऊन जो तो राजा त्यास आपली कन्या देऊन जामात करण्याम चाहत होता; तद्वतच आपल्या सौंदर्यादि गुणकरून अवंतीनगराच्या काशीराज नृपाची एकुलती एक कन्या 'चंपकमाला, ही प्रसिद्धीस आली होतीही. व काशिराजासही अशी उत्तम गुणवती कन्या कोणास अर्पण करावी ही पूर्वी पासूनच मोठी काळजी असे, ह्मणून त्यांनी मदनवि- लासाचे गुणादिक त्याचे कांनीं पडतांच तो त्वरेनें सुवर्णचपकनगरीस येऊन त्याने मोठ्या विनयाने आणि चार चौघां थोर मंडळीस मध्यस्थी घालून व चंपक- माला आणि मदनविलास ह्यांचा जोडा समकत्वामुळें