Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

स्तव आपणांस धन्य मानीत ! धन्य मानण्याचा हेतु इतकाच असे कीं, आपणास उत्तर वयांत हा पुत्र झाला व ह्याचे नेहमीं सर्व तऱ्हेचे लाड होत आहेत तरी देखील हा आपलें वळण सोडून इतर राजपुत्रा- प्रमाणे दुसऱ्याचा हेवा करणे, मन मानेल तशा री- तीनें वागणं, परकियास पीड़ा देणें आईबाप व इतर सं- भावित लोक ह्यांचा उपमर्द करणें, इत्यादि दुष्कृत्या- स शिवत नाहीं !! याप्रमाणे तो आपल्या मित्रांसह विद्याव्यासंगक्रमांत निमग्न असतां त्याची विलक्षण बुद्धि, सुस्वभाव, इत्यादि गुणांचा कीर्तिध्वनि दूर दूर देशच्या नृपवरांच्या कानी पडत जाऊन कित्येक राजे त्यास मुद्दाम पहावयास येऊ लागले होते. त्या वेळी तो नुकताच १४ वर्षांचा झाला होता व त्या- च्या शरिराची अनुपम रचना, अलौकिक सौंदर्य, सदैव हास्यमुख, बोलणें सयुक्तिक व गोड, तारुण्य- भरानें दिवसेंदिवस वाढत चाललेले शरीरस्थ दिव्यतेज आणि ती इभ्रत इत्यादि गुणकरून त्याच्या प्रत्यक्ष दर्शनानें कसाही दुःखी किंवा क्षुब्ध मनुष्य असला तरी तो तेव्हांच शांत होई आणि तेणेंकरून ह्या राज- पुत्राजवळ अशी काय मोहनी आहे कीं जेणेंकरून हा असा आश्चर्यचकित परिणाम घडतो !! हाणून प्रेक्षक नेहमी गुंग होऊन जात. यास्तव कित्येक राजे त्यास पाहून आनंदमरांत असतां हा आपला जामात व्हावा अशी इंदुशेखराजवळ मनीषा प्रदर्शित करूं लागले होते. परंतु राजार्चे हा विद्याव्यासंगांतून मो- कळा झाल्यावांचून मी ह्याचा विवाह करण्यास इ-