Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रातिमंदीर.

सावकार विजयशेट ह्याचा पुत्र मुंकुदमाधव हे समव- यस्क व समानरूप शीलाचे होते ह्मणून त्या दोघां- सही इंदुशेखरानें आपल्या पुत्रासंगतीने एकाच ठि काणीं विद्याभ्यास करविण्याकरितां ठेविलें होतें. त्या तिघांचें सदैव एकत्र राहणें, खाणें पिणें, वगैरे होऊं लागल्याने थोडक्याच काळांत त्याचें परस्परावर विशेष प्रेम जडून त्यांना एकमेकांविरहित क्षणभरही राहणें कठिण वाटू लागलें होतें व तें बालपणाचें पर- स्पर निष्कपट प्रेम पाहून इंदुशेखर राजास मोठें स- माधान व कौतुक वाटत असे.
 मदनविलासाचें लक्ष लहानपणापासून स्वभावतः आणि सुशिक्षणामुळे विद्याभ्यासांत गढलें राही, ह्म- णून त्यानें अल्प वयांतच उपयुक्त अशा बहुतेक वि- घेशीं चिरपरिचय करून घेतला होता. शारीरारो- ग्यास अत्यंत अवश्य जी मल्लविद्या आणि शत्रु निर्दाल- नास्तव स्वजाति श्रेष्ठजनमान्य अशी धनुर्विद्या याही संपादन केल्या होत्या, बुद्धीच्या ठायीं तिव्रता, चातुर्य आणि विषयांचे ज्ञान संपादण्याची मार्मिकता हे गुण अनुकूल असल्यावर मग फार दिवस आणि अि परिश्रम करणें कशाला हवेत ? नकोच अस्तु. वर सांगितल्याप्रमाणे तो राजपुत्र मदनविलास अल्पाव- तच बहुतेक विद्या शिकून निष्णात होत चालला असल्यामुळे त्याची सर्वतोमुखीं वाहवा होत चालली होती, तेर्णेकरून त्या राजकुलावतंस पुत्राच्या जन- नानें त्याच्या मातापितरांस परमावधीचें समाधान वा- दूं लागलें होतें. आणि ते त्या अमूल्य पुत्ररत्न प्राप्ति-