Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

धान्याची संमृद्धि राही आणि त्या योगें गरीबगुरित्रा- सही पोटभर भाकरतुकडा खावयास मिळत होतां अ निप्रलय, अनावृष्टि, अकालिक मृत्यु, महारोगाचे साथ वगैरे विघ्नें स्वमीही कोणी पहात नव्हते. प्रजा विद्याभिवृद्धीच्या द्वारें समंजस झाली असल्यामुळे अन्याय रावाचें लोकसमाजांतही पाऊल दृष्टीस पडे- नासें झालें होतें. ह्मणजे सर्वत्र शांतता असल्यामुळे तो महाराष्ट्र देशवासिनी प्रजा खन्या खच्या स्वातंत्र्य- सौख्याचा अनुभव पावत असे. अशा रीतीनें त्या प्रजा- जन मनसंतापहारक चतुर पुण्यशील आणि भाग्य- वान नृपानें त्या महाराष्ट्रदेशचे राज्य चालवीत अस तां ह्या भूमंडळावर आपली कीर्तिरूप गंगा तिचा को- ठेही अवरोध होऊ न देतां पसरविली होती. अस्तु. वाचकहो ! त्या राजास त्याचे अतुल पुण्यप्रतापैक- रून म्हणा किंवा ईशकृपेनें म्हणा. उत्तर वयांत एक पुत्ररत्न झालें होतें. उत्तरवयांत होण्याचे कारण असे असावें, ह्मणून वाटतें कीं, अशा पवित्र राजाचे पोर्टी कोणास जन्म व्हावा याचा विधात्यास पुष्कळ दिवस पावेतों विचार पहावा लागला असेल ! असो. इंदुशेखराने त्या आपल्या पुत्राचें त्यास योग्यच असें 'मदन विलास' ह्मणून मोठ्या आवडीचे नांव ठेविलें हो तें पुढें तो पांच वर्षांचा झाल्यावर त्यानें त्यास आ- पल्या पदरीं वेतन देऊन ठेवून घेतलेल्या विद्वानांच्या हातीं देऊन सुशिक्षण देण्याची सोय केली होती. व त्या सुमारास इंदुशेखर राजाचा प्रधान भद्रसेन ह्याचा पुत्र चंद्रकांत आणि सुवर्णचंपक नगरीतील गर्भश्रीमान