Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

सदावर्ते, अन्नस, घातलीं होतीं, ब्राह्मणांस इच्छा- भोजन घालणें, व नित्य विप्रसमुदायांस सवत्स अलं- कारभूषणमंडित गोप्रदानें, व इतर अनेकप्रकारचीं दानें वांटण्याची तजवीज केली होती. राज्य संरक्ष- णार्थ जागोजाग जयत फौज ठेवून तिचा पगार वगैरे जेव्हांचा तेव्हां देऊन टाकून हूं ह्मणतां कत्तल उडवि- ण्यास तयार अशी संतुष्ट ठेविली होती. व अधिका- रि लोक कशारीतीनें वागतात ह्याचा बारकाईनें शो- ध काढून आणवून अपराध्यास शिक्षा व योग्य तह- नें अम्मल करणारास बक्षिस देण्याची वहिवाट सुरु ठेविली होती. व्यापार धंदा वगैरेवर कंबर वाक- ण्यासारखे कर न बसवितां त्या भांडवलांत आपल्या खजिन्यांतून चिनव्याजी द्रव्य मिळवून तो वाढवीत असे. शेतकीचा सारा प्रतिवर्षी उत्पन्नाच्या मानाने धान्य रूपानें घेऊन त्याची मोठमोठी कोठारें भरून ठेववी. अशा अनेक लोकोपयोगी सोयी त्यानें केल्यामुळे त्या देशची संपूर्ण प्रजा संतुष्ट राहून त्यांचे कल्याण चिंतित असे, आणि त्यायोगे त्या उभयतांमध्ये दिवसें दिवस अ धिक अप्रतिम व अकृत्रिम दृढप्रेम बसत चाललें होतें. इंदुशेखराचे प्रधान वर्गादी मुख्य मुख्य हुद्देदारही रा. ज्यकारणकुशल, स्वामीभक्त, व चार चौघांनी वाख णण्यासारखे असे असल्यामुळे त्याचे स्वकर्तव्य के. व्हांही चुकत नव्हतें. व तेर्णेकरून त्याचा सर्वत्र दरारा बसून शत्रूंचा काडीमात्र शिरकाव किंवा स्वराज्यांत फंदफितूर होत नसे. यज्ञयागादीक वारंवार होत असल्यामुळे पर्जन्यवृष्टि वेळेवर होऊन देशभर