Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

रूठेविला होता. जागजागीं धर्मशाळा, तलाव, वि- हिरी बांधिल्या होत्या. पाट, कालवे काढून आणवून शेतकी कामास पाण्याचा पुरवठा केला होता. चोहों- कडेस नवीन सडकांचे मार्ग काढून त्याचे दोहों बाजूस समांतराने सघन वृक्षांची गर्द छाया करविली होती. पुरातन देवळें मशीदी वगैरेंचा जीर्णोद्धार व नवीन मोठमोठ्या हवेल्या, मजेदार जाणि हवाशीर मंदिरें, कशीदार, सुंदर आणि भव्य देवळे, मनोरे व बगीचे ही तयार करवून त्यांचा नेहमीं व्यवस्थितपणा ठेविला होता. पर्जन्यकाळांत उतार होऊं न देणाऱ्या नद्यादि- कांस मोठाले पूल बांधिले होते. सरहद्दीवरील गां- वास तट घातले होते. अनाथ लोकप्रतिपाळक गृहें जागजागी बांधिली होतीं. तसेंच पूर्वापार चालत . आलेल्या जाहागिरी, इनाम, देवस्थानें, अग्निहोत्री, आणि विद्वान, ह्यांच्या नेमणुका निर्वेधपणे चालू ठे- वून त्या नियमीत रकमा ज्यांच्या त्यांस प्रयास न प- डतां प्रतिवर्षी मिळविण्याची व्यवस्था राखिली होती. परराज्यांतून आलेल्या विद्वानांची योग्यतेनुरूप संभा- वना होण्याकरितां आपल्या पदरीं वेदांती, मीमांसक, धर्मशास्त्री, जोतिषी आणि नय्यायिक आदीकरून स्व. . विद्यानिष्णात असे विद्वान वेतनें देऊन ठेविले होते. आणि तें विद्वन्मंडल दरबारांत नित्यशाहा येत अस- ल्यामुळे प्रेक्षकांस तो भोजराजाप्रमाणे दिसत असे! तसेच गवई, सुंदर गायनकलाप्रवीण वेश्या आणि हरिदास व नाना तऱ्हेचे कारागीर, शिल्पशास्त्रज्ञ लो- क. त्याचे आश्रयास सदैव असत. क्षेत्रादिकांच्याठाय