Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विश्रांतिमंदीर.

 प्राचीनकाळीं महाराष्ट्र देशांत सुवर्णचंपक ह्मणून एक अति प्रख्यात आणि रमणीय असें नगर होतें, तेथें इंदुशेखर नामक राजा राज्य करीत होता. तो सज्जनवृदप्रिय, सद्धर्मप्रतिपालक, पापभीरु, परम शूर आणि प्रजाजन हितचिंतक असा होता. त्यास प्रजा- जन संतुष्ट राखणे हैं मोठ्या आवडीचें व प्रथमचें क र्तव्यकर्म वाटत असे. तो आपले हृदयमंदिरीं अक्षय सत्यासत्यतेचा विचार वागवून कोणतेही कृत्य करी. ईशाज्ञा पाळण्याविषयीं तो सदां तत्पर असे. प्रजेस वागविण्याचे नियम शास्त्रसंमतच परंतु अत्यंत सुलभ असे त्यानें घातले होते, ते इतके कांहीं योग्य होते कीं, त्या काळच्या कित्येक राजे लोकांनी त्या निय- माघारें आपल्या राज्यांत सुधारणा करून पाहून अ- नुभवांत त्यांना ते फारच पसंत झाले होते; आणि ह्मणून त्याची त्या गुणांबद्दल सर्वत्र वहावा होत होती.
 प्रजेस जिकडून सुख होईल अशा त्यानें आपल्या राज्यांत अनेक सोई केल्या होत्या त्या अशाः आ पल्या राज्याचे मुख्य चार व चाराचे प्रत्येकी आणखी कित्येक पोटविभाग केले असून त्यावर आपल्या रा- जघराण्यांतील व कांहीं दुसरे हुशार, न्यायी असे अ- म्मलदार नेमिले होते. प्रजा सुशिक्षित होण्यासाठीं गावगांव सुशील व परहित साधण्याची ज्यांना खरी कळकळ आहे असे विद्वान लोक पाठवून अल्पाया- सानें विद्याप्राप्तीची सोय केली होती. व्यापारधंद्यास उत्तेजन देऊन तो भरभराटीस आणण्याचा प्रयत्न सु-