Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रंजन आणि सुबोध.
प्रकरण २ रें.
गृहशोभा ( सुगृहिणीची योग्यता . )

 तुह्मी मोठे विद्वान असा, धनाढ्य असा, शेंकडोंश लोकांवर तुमचा अम्मल चालत असो आणि आई बाप भाऊबंद वगैरे सर्व तुह्मांस अनुकूल असोत, परंतु तुमच्या अंतःकरणास खरें सुख प्राप्त होण्यास, गृहसुधारणेस आणि तुमचे मानसिक हेतु पूर्ण होण्या- स तुह्मास स्वभार्याच अनुकूल असली पाहिजे. तुमच्या अंतःकरणाची गोष्ट तुह्मी सांगण्यापूर्वीच जी जा. णून तुमचें काज सिद्धीस नेईल तीच भार्या तुह्मास प्रिय होईल हें खरें;! परंतु तुह्मी भार्या ज्या कुळांतील केली असेल त्या कुळांतील लहान थोर माणसाच्या वर्तनक्रमानुसार तुमच्या भार्येस जन्मतः वळण ला- गलें असावयाचें? तें तुमच्या वर्तनाशीं साम्य अस ल्यास ठीकच ! जर उलट कांहीं प्रकार असेल तर तो तुझीं शांतपणा ठेवून सुधारला पाहिजे. कारण अनुकरण करण्याचा प्रत्येक व्यक्तिमात्रास उपजतच ईश्वरदत्त गुण प्राप्त असतोच! तुमची भार्या वळण- शुद्ध नसेल किंवा तुमचे वागुणिकीचे नियम अमुकच आहेत हें जर तुह्मीं तिजप्रत प्रथम कळविले नसलें तर तुमच्या मर्जीनुरूप तिची वागणूक होण्यास तुझीं काय केले पाहिजे बरे; फार कांहीं करावयास नको. तर ती ज्या कांहीं गोष्टी चुकत असेल त्या “ तूं अमू-