Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रंजन आणि सुबोध.

सत्य हैं आधी असावें. कारण जेथे सत्य तेथेच यश- प्राप्ति आणि ह्मणूनच ' सत्यंजय' अर्से ह्मणतात यास्तव आपणास दरवारी न्याय मिळविण्याचे वेळीं देखील सत्यच सदैव जवळ बाळगिले पाहिजे.
 एकंदरवरून दरवारी न्याय मिळविण्यास वरी- ल प्रमुख चार गोष्टींची केव्हांही आणि सर्वांस अनु- कूलता असलीच पाहिजे अशाविषयीं आमच्या वा- चकांची खात्री झालींच असेल. ह्मणून प्रत्येकांनी ह्या लेखासंबंधानें आपली स्वानुभवशिद्ध प्रतिति कशी काय आहे हैं ताडून पाहून त्यास ह्या नियमा- धारें आपलं वर्तन ठेवण्याची इच्छा झाल्यास ती प्रां जळपणानें आपल्या मित्र मंडळीपुढे मांडण्यास तत्पर असावे आणि शेतकरी वगैरे अज्ञानांधकारांत पडलेल्या दीन दुबळ्या लोकांस ह्या गोष्टी संबंधानें नेहमी उपदेश करावा अशी आमची सर्वांस विनंति आहे. आतां राजनीति प्रसंगोपात सापासारखी कशी उलट पालट होऊं शकते ह्याची साक्ष देण्या- करितां वा० पंडितांनी रचलेला एक श्लोक येथें सादर करून हा विषय आटोपता घेतों.

श्लोक

केव्हां सत्य वदे वदे अनृतही केव्हां वदे गोडही ॥
केव्हां अप्रियही दयाहि असे केव्हां करी घात ही ॥
जोडी अर्थही जे यथेष्ट समयों की रेचही आदरी ॥
ऐशी हे नृपनीति भासत असे वारांगनेचे परी ॥१॥