Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रंजन आणि सुबोध.

क जागीं चुकतेस ह्मणून तिला एकवार सोडून दहादां समजून दिल्या पाहिजेत,, आणि आपली तब्बीयत नेहमी एकाच वळणानें ठेवण्याविषयीं आपण जपा- वें तरीही पण ह्या दोन गोष्टींत सत्याला सोडूं नये. त्याच प्रमाणें आपण तिला ज्या ज्या म्ह- णून ब-यावाईट गोष्टीविषयीं उपदेश करीत असूं त्या त्या गोष्टींत आपले वर्तन विशुद्ध आहे कीं काय ? र्हे नेहमीं पहात असावें. ! ! नाहीं तर तूं अमूक असें करूं नकोस ह्मणून स्त्रीयेस उपदेश केला आणि आ- पणास तर त्या गोष्टी केल्यावांचून राहवत नाहीं! अर्से केल्याने त्या उपदेशांपासून कांहींएक हित व्हावयाचें नाहीं ! ह्मणून आपल्या सारखी आपली भार्या व्हावयाला आपला उपदेश ज्या प्रमाणावर अ- सेल त्याच प्रमाणावर आपण स्वतः आपले वर्तन ठे- विलें पाहिजे. कारण सहवासाने मनुष्याचें वर्तनक- मांत सहज बदल होतो. हाटलें आहे:-

*आर्या.

पति सहवासें स्त्रीचें चित्त पति समान
होतसे दुष्ट ॥
विषवृक्षाश्रित व मधुरहि मूर्च्छित
करीतसे स्पष्ट ॥ १ ॥

ह्मणून सहवासानेच कांहीं दिवसांनीं आपलें वळ- ण स्त्रीस लागेलच यास्तव अधीर न होतां आपले अं-


 हें पद्य दुःसंग प्रदर्शनावह जरी आहे, तरी पण सहवासानें त्रि- ये अंतःकरण बदलतें किंवा कसें एवढेच कायतें ध्यावयाचें.